‘फोमेंतो स्कॉलर्स’साठी नावनोंदणी करण्याचे आवाहन…

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव : फोमेंतो कंपनीच्या वतीने ‘फोमेंतो स्कॉलर्स’ उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय अभियांत्रिकी शिक्षणाची सोय करून दिली जात आहे. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतलेल्या व दहावीत ८५ टक्के गुण प्राप्त केलेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणासाठी मदत हवी असल्यास ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत www.fomentoscholar.org या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा:उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा…
मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिले जाते
अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर यूएसए येथील एसडीएसएमटी या अभियांत्रिकी आस्थापनात प्रवेश मिळावा, यासाठी ‘फोमेंतो स्कॉलर्स’ उपक्रमाद्वारे मदत केली जाते. या उपक्रमाची सुरुवात २०१४ सालापासून करण्यात आली आहे. आतापर्यंत या उपक्रमांतर्गत २५ विद्यार्थ्यांनी यूएसए येथील एसडीएसएमटीमध्ये शिक्षण घेतले आहे. यात मुलांसह मुलींचाही समावेश आहे. एसडीएसएमटी ही शिक्षण संस्था चांगल्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी नावाजलेली आहे. यामध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष दिले जाते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंटर्नशीपची संधी मिळते. शिक्षण घेतानाच चांगल्या कंपन्यांसोबत काम करण्यासह चांगले उत्पन्नही प्राप्त होते. पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर चांगल्या कंपन्यांमध्ये मोठ्या पगारासह कामाची संधी मिळते. फोमेंतो स्कॉलर्ससाठी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह त्यांची ज्ञान मिळवण्याची वृत्तीही पाहिली जाते.
हेही वाचा:२४ तासांत आणखी २०१ करोनाबाधित…
योजनेसाठी पात्रता…
- विद्यार्थी गोव्यातील व एसडीएसएमटीमध्ये जाण्यास इच्छुक असावा.
- विद्यार्थ्याने दहावीमध्ये ८५ टक्के गुण प्राप्त केलेले असावेत.
- त्याने गोव्यात २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.
- पात्र विद्यार्थ्याने www.fomentoscholar.org या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
- नावनोंदणीनंतर निवडीबाबतची व इतर माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या ई-मेलवर पाठवली जाईल
हेही वाचा:सत्तरी तालुका जुगाराच्या विळख्यात…
गरुडभरारी घेण्याचे आवाहन
अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी परदेशातील चांगल्या संस्थेत उच्च शिक्षण घेण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. बारावी उत्तीर्ण झाल्यावर यूएसए येथील एसडीएसएमटी या संस्थेत प्रवेश मिळवून भविष्यात गरुडभरारी घ्यावी, असे आवाहन फोमेंतो कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.
हेही वाचा:सभापतींनी त्वरित पोलिस तक्रार करुन मुख्यमंत्र्याची चौकशी करावी…