राहुल म्हांबरे यांच्यासह ‘आप’चे कार्यकर्ते ताब्यात

Goan Varta Live | प्रतिनिधी
पणजी : गोवा हा गोमंतकीयांचाच आहे, तो अदानींचा होउ देणार नाही, असा थेट इशारा देत आम आदमी पार्टीचे नेते राहुल म्हांबरे (Rahul Mhambre) यांच्या नेतृत्वाखाली आपच्या कार्यकर्त्यांनी आल्तिनोत धरणे धरली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या शासकीय घराबाहेर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेउन घोषणा दिल्या. मात्र पोलिसांनी राहुल म्हांबरे यांच्यासह ‘आप’च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
दरम्यान, गोव्याचं भवितव्या दिल्ली नव्हे तर गोयकारच ठरवतील, असं आपने म्हटलं होतं. गोव्यातले सर्व निर्णय, गोवेकरांसाठी गोवेकरांनीच घेतले पाहिजेत. गोवा ही काही केंद्र सरकार अथवा भाजपच्या राज्यांच्या मालकीची वसाहत नव्हे, अशा शब्दांत सत्ताधारी भाजपवर टीका केली होती.
प्रमोद सावंत सरकारनं कोळसा वाहतुकीवरून अदानींच्या फायद्यासाठी जी पाऊलं उचलली आहेत, त्याविरुद्ध गोमंतकीय जनता गेले काही महिने निकराने लढा देतेय. पण प्रमोद सावंत सरकारने लाखो गोयकारांच्या आवाजाकडे जाणूनबुजून कानाडोळा केल्याचा आरोप आपने केलाय. गोमंतकीयांच्या विरोधाला काडीचीही किंमत दिलेली नाही, असंही आपने म्हटलंय.