‘अपना भाडा’चे लोकार्पण; दोन दिवसांत टॅक्सी सेवा सुरू

प्रवाशांना सुरक्षित, पारदर्शक, माफत दरांत सेवा देणार : मुर्तझा अली

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: ‘अपना भाडा’ या अ‍ॅपपवर आधारित टॅक्सी सेवेचे शुक्रवारी व्हर्च्युअल पद्धतीने लोकार्पण करण्यात आलं. स्थानिक तसेच पर्यटकांना सुरक्षित, पारदर्शक आणि माफक दरांत टॅक्सी सेवा देण्यावर ‘अपना भाडा’चा नेहमीच भर राहील. अ‍ॅपवर आधारित या सेवेंतर्गत पुढील दोन दिवसांत २२ वाहने रस्त्यांवर उतरतील, अशी माहिती ‘अपना भाडा’चे संस्थापक तथा मालक मुर्तझा अली यांनी दिली.

पुढील 2 दिवसात २२ जणांची वाहनं ‘अपना भाडा’अंतर्गत धावणार गोव्यातील रस्त्यांवर

रिलायन्स कंपनी संचलित ‘अपना भाडा’च्या लोकार्पण सोहळ्यात मुर्तझा अली यांच्यासोबत सीआयओ अंकूर चढ्ढा आ​णि सीएचओ मिसेस आयशा उपस्थित होत्या. पुढील दोन दिवसांत ज्या २२ जणांची वाहने सेवेअंतर्गत रस्त्यांवर उतरणार आहेत. त्यांच्या नावांची घोषणा मिसेस आयशा यांनी यावेळी केली. या २२ वाहनांनंतर पुढील आठवड्याभरात इतर वाहनेही रस्त्यांवर उतरून नागरिक तसेच पर्यटकांना दर्जेदार टॅक्सी सेवा देतील, असे मुर्तझा अली म्हणाले.

प्रवाशांना देणार दर्जेदार सेवा

राज्यातील टॅक्सी वादामुळे काहीजणांत अ‍ॅपपवर आधारित टॅक्सी सेवेबाबत नकारात्मकता पसरली होती. अशांमध्ये पुन्हा सरकारात्मकता आणण्याच्या दृष्टीने अपना भाडा कार्यरत राहील. यातून प्रवाशांना निश्चित दर्जेदार सेवा मिळेल, असे ते म्हणाले. करोनामुळे राज्याची अवस्था पुन्हा बिकट बनू लागली आहे. करोना प्रसार वाढू नये, यासाठी नागरिकांना घरीच राहावं लागत आहे. पण, ही परिस्थिती लवकरच बदलेल. नागरिकांना पुन्हा एकदा मनसोक्त जगता येईल, असा विश्वासही अली यांनी व्यक्त केला.

पहिले दोन महिने विमानतळ ते विमानतळ मोफत सेवा

दरम्यान, सीआयओ अंकूर चढ्ढा यांनी ‘अपना भाडा’ अ‍ॅपची संकल्पना जनतेसमोर मांडली. अ‍ॅप डाऊनलोड करण्यापासून ते सेवा घेण्यापर्यंत आणि भाडे भरण्यापर्यंतची प्रक्रिया त्यांनी समजावून सांगितली. विमानाद्वारे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पहिले दोन महिने ‘अपना भाडा’ विमानतळ ते विमानतळ अशी मोफत सेवा देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. `अपना भाडा`चे गोव्याचे बिझनेस असोसिएट म्हणून फिरोज आगा हे काम पाहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅक्सी सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल!

राज्यात सध्या स्थानिक टॅक्सी मालक आणि अ‍ॅपवर आधारित टॅक्सी सेवा यांच्यात वाद सुरू आहे. अशा परिस्थितीतही गोमंतकीय जनता आणि देश-विदेशातून गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना वाजवी दरांत दर्जेदार आणि सुरक्षित टॅक्सी सेवा देण्याच्या ‘अपना भाडा’ मैदानात उतरली आहे. यात लवकरच आम्हाला यश मिळेल, नागरिक आणि पर्यटकांकडून आमच्या टॅक्सी सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मुर्तझा अली यांनी व्यक्त केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!