सपासप कुऱ्हाडीनं वार करत अनवर शेख रक्तबंबाळ, हत्येचा धक्कादायक Video Viral

पळवून पळवून अनवर शेखला मारला!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : अनवर शेखची हत्या झाली. रविवारी या हत्येनं गोव्याचं गुन्हेगारी विश्व हादरून गेलंय. दरम्यान, रविवारपासूनच या धक्कादायक घटनेचे नवनवे व्हिडीओ समोर येत आहेत. दरम्यान, आता अवनर शेखवर सपासप वार करुन त्याला रक्तबंबाळ अवस्थेत व्हिडीओत पाहायला मिळालंय.

गँगवॉरचा बळी!

कर्नाटकात अनवर शेखची रविवारी संध्याकाळी हत्या करण्यात आली. यावेळी तीन जणांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला. अनवर शेखनंही बचावाखातर प्रतिहल्ला केला. मात्र हा हल्ला अपुरा ठरला. गँगस्टर अनवर शेख उर्फ टायगरचे अनेक शत्रू होते. त्यापैकीच एका गटानं अनवर शेखवर रविवारी कुऱ्हाडीनं वार करत हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या अनवर शेखनंही स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण चार जणांसमोर अनवरची ताकद तोडकी पडली. मानेवर, डोक्यावर, छातीवर आणि पाठीवर कुऱ्हाडीसोबत धारधार शस्त्रानं अनवर शेखवर जीवघेणे वार करण्यात आले.

हेही वाचा – Video | Crime | Rape | पोलीस असल्याचा बहाणा करत दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार

सपासप वार!

तुला आम्ही जीवे मारु, अशी धमक्या देत बाचाबाची करत हा सगळं थरारक प्रकार घडला. एखाद्या सिनेमाच्या प्रसंगालाही लाजवेल इतकी भीषण घटना कॅमेऱ्यातही एकानं कैद केली आहे. यामध्ये अनवर शेखचे मारेकरी स्पष्टपणे दिसून येत आहेत. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला अनवरची कॉलर एकानं पकडली आहे. तर तिघे जण आळीपाळीनं अनवर शेखवर वार करताना दिसून आलेत. शिव्यांच्या लाखोल्या वाहताना अनवर शेखवर त्यांनी सपासप वार केलेत. यावेळी रस्त्यावरुन वाहनांची ये-जा देखील सुरु होती. मात्र कुणाचीही भीडभाड न ठेवता, भररस्त्यात ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं कायदा आणि सुव्यवस्थेचे तर धिंदवडे उडवलेत. पण पोलिसांच्या नाकावर टिच्चून सुरु असलेल्या गँगवॉरचा काळा चेहराही उघड केलाय. कुऱ्हाड, कोयता या सगळ्याचा वापर करुन करण्यात आलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – Crime | Police | Allegations Against Police | पोलिसांच्या जाचाला कंटाळून तिघांची आत्महत्या?

कोण आहे गुंड अनवर शेख?

कुख्यात गुंड अन्वर उफ टायगर शेख याच्यावर राज्यातील विविध पोलिस ठाण्यात तब्बल २६ गुन्हे दाखल आहेत. २०१९ मध्ये केपे येथील लैंगिक अत्याचारप्रकरणात त्याला अटक झालेली होती व फेब्रुवारी २०२१ मध्ये फातोर्डा येथे त्याच्यावर खुनी हल्लाही झालेला होता.

बलात्कार, अपहरण, जीवे मारण्याच्या धमकी देणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, मारामारी, दरोडा, घरफोडी, चोरी, लैंगिक शोषण, खंडणी वसुली, बेकायदा जमाव करणे, प्राणघातक हल्ला करणे अशा सुमारे २६ गुन्हे दाखल असलेल्या मडगाव येथील कुख्यात गुंड अन्वर उफ टायगर शेख याचा हावेरी सवनुरु येथे अज्ञातांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. कर्नाटकातील हावेरी तालुक्यातील सवनुरु हे गुंड अन्वरचे जन्मठिकाण असून काही दिवसांपासून तो त्याठिकाणीच वास्तव्यास होता. रविवारी सकाळी काही तरुणांनी गुंड अन्वर याच्या मानेवर कुऱ्हाडीने वार करण्यात केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अन्वरचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा – Crime | Paroda Fight | तुफान राडा! पारोडात तिघांना बेदम चोप

कर्नाटकातील काही गुंडांशीही अन्वरचे संबंध चांगले नव्हते. काही लोकांकडून त्याने पैशांची मागणीही केली होती. त्यातूनच हा हल्ला झाला असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

याआधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी याआधीच अन्वरला दक्षिण गोव्यातून तडीपारीची कारवाई केली होती तर राज्यातून तडीपार करण्याची प्रक्रियाही २०१९ मध्ये करण्यात आली होती. कोलवा, मडगाव, फातोर्डा, कुडचडे ठाण्यात त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जमाव करून दंगा करणे, प्राणघातक हल्ला अशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत. याशिवाय चोरी, बलात्कार, अपहरण, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, दरोडा, घरफोडी, मारण्याचा प्रयत्न करणे या कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. यातील काही गुन्ह्यांचे खटले सुरू आहेत तर काहींची सुनावणी झालेली आहे.

हेही वाचा – Crime | Gang war | ताळगावातील ४ जूनचा हल्ला म्हणजे गँगवॉरच!

फेब्रुवारीत हल्ल्यातून बचावला होता

आर्ले फातोर्डा याठिकाणी १६ फेब्रुवारी २०२१ रोजी गुंड अन्वर शेख याच्यावर अंतर्गत वादातून संशयित रिकी होर्णेकर व इतर संशयितांनी तलवार, चेन, लोखंडी दांडा, कोयता व बंदूक असा सशस्त्र हल्ला केला होता. पोलिस अधीक्षक सॅमी तावारीस घटनास्थळी दाखल झाल्याने या हल्ल्यातून गुंड अन्वर बचावला होता. या प्रकरणातील सहाजणांवर आरोप निश्चिती झालेली होती तर दोघांची निर्दाेष मुक्तता करण्यात आलेली आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!