अन्वर शेखवर हल्ला प्रकरण: रिकी होर्णेकरला सशर्त जामीन मंजूर

२५ हजार रुपयांची हमी, तितक्याच रकमेचा हमीदार व इतर अटींवर सशर्त जामीन

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: कुख्यात गुंड अन्वर शेख याच्यावर कोयत्याने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुख्य संशयित रिकी होर्णेकर याला मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व  सत्र न्यायालयाने २५ हजार रुपयांची हमी, तितक्याच रकमेचा हमीदार व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.      

हेही वाचाः शाळेपासून दूर राहिल्यानं विद्यार्थ्यांचं मानसिक आरोग्य बिघडतंय

आठ संशयितांविरोधात २०० पानी आरोपपत्र दाखल

या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी मडगाव येथील प्रथमवर्ग न्यायालयात एकूण आठ संशयितांविरोधात २०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात २० जणांची साक्ष नोंद करण्यात आली आहे. आरोपपत्रानुसार, १६ फेब्रुवारी २०२१ रोजी आर्ले परिसरात ही खुनीहल्ल्याची घटना घडली होती. त्यावेळी वाहन बंद पडल्याने मेकॅनिककडे जाणाऱ्या अन्वरला हेरून रिकी, विपुल व अन्य संशयितांनी मिळून त्याच्यावर तलवार, चेन, रॉड, कोयता, बंदूक आदी शस्त्रांसह हल्ला चढविला होता. त्यावेळी पोलीस अधीक्षक सेमी तावारीस योगायोगाने घटनास्थळी पोचल्याने अन्वरचा जीव वाचला होता.

या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी रिकी हॉर्णेकर (कुडचडे), हर्षवर्धन सावळ (म्हापसा), इम्रान बेपारी (कुडचडे), विजय कारबोटकर (पर्वरी), मयूर तानावडे (पर्वरी), सुधान डिकोस्टा, व्हॅली डिकॉस्टा व अमिर गवंडी यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा नोंद केला होता.      

हेही वाचाः अब तक 56! सेन्सेक्स 56 हजाराच्या पार, शेअर बाजारात नवा विक्रम

रिकी होर्णेकरला सशर्त जामीन मंजूर

या प्रकरणातील सुधान, विजय आणि मयूर तानावडे या तिघांना न्यायालयाने अगोदर सशर्त जामीन मंजूर केला आहे. यातील मुख्य संशयित रिकी होर्णेकर याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने २५ हजार रुपयांची हमी, तितक्याच रकमेचा हमीदार व इतर अटींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे.      

हेही वाचाः सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! वीज आणि आरोग्य खात्यात नोकरी हवी असेल, तर लगेचच अर्ज करा!

दरम्यान, गुंड अन्वर याचा खून करण्यात आल्यामुळे या प्रकरणात वेगळे वळण येणार आहे

हा व्हिडिओ पहाः VIDEO | CCP | उदय मडकईकरांनी रोहीत मोन्सेरातांना झापलं

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!