हल्ला झाला तेव्हा अनवरच्या हातात पिस्तूल होतं! पण तो गोळी का झाडू शकला नाही?

पोलीस तपासातून अधिक माहिती उघड

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : कुख्यात गँगस्टर अनवर शेखचा खून झाला. रविवारी या घटनेचा व्हिडीओ सोमवारी सोशल मीडियावर बघता बघता व्हायरल झाला. सोमवारीच पोलिसांनी या हत्येप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं. दरम्यान, याप्रकरणातील इतर तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय. भररस्त्यात करण्यात आलेल्या हत्येप्रकरणी आता अधिक खुलासे होऊ लागले आहेत.

अनवर शेखरवर झालेला हल्ला किती भयंकर होता, हे व्हिडीओतून उघड झालंच आहे. पण या या हल्ल्यावेळीही अनवर शेखच्या हातात पिस्तुल होतं. कोयता आणि कुऱ्हाडीनं जेव्हा वार झाले, तेव्हा या पिस्तुलाचा वापर अनवरने का केला नाही, असाही प्रश्न उपस्थित होत होता.

हेही वाचा – गोव्यासह देशाच्या किनारपट्टीवरील १२ शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका

नकली पिस्तुलाची दहशत!

दरम्यान, याबाबतच धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ज्या पिस्तुलाचा धाक दाखवून अनवरने आपली दहशत पसरवली होती, ती पिस्तुल बनावट स्वरुपाची असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यावेळी अनवर शेख उर्फ टायगरच्या हातातील रिव्हॉल्व्हर त्यानं रोखली होती. पण त्याचा चाप तो ओढत नव्हता, अशी धक्कादायक माहितीही सावनूर पोलिसांच्या तपासात समोर आली. एका आरोपीनंच आपल्या घरात हे बनावट पिस्तुल लपवून ठेवल्याचंही समोर आलंय. पोलीस अधिक्षक हनुमंतराया यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा – ‘त्या’ नराधमांना पोलिसांनी अद्दल घडवलीच नव्हती, कैद्यांनीच केलं बलात्काऱ्यांचं रॅगिंग

या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेतलंय. तसंच एक कुऱ्हाड, दोन सुरे आणि अनवर जी स्विफ्ट कार वापरत होता, ती देखील जप्त केली आहे. आता लवकरच नकली पिस्तुलदेखील पोलीस हस्तगत करणार आहेत.

कशामुळे हत्या?

पोलीस चौकशीतून अनवर शेख याच्या हत्येमागणी कारणंही हळूहळू समोर येत आहेत. पैशांच्या कारणावरुन ही हत्या झाल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे. अनवर वारंवार सावनूर इथं यायचा आणि अनेकांकडून पैसे उकळायचा. ज्यांनी अनवरची हत्या केली त्यांच्याकडूनही पैसे उकळण्यात आले होते. धमकावून पैसे उकळण्याचा प्रकार वाढल्यामुळे अनवरविरोधात पोलिसात तक्रारही दाखल झाली होती. पण पोलिसांत तक्रार दाखल होताच अनवर कर्नाटकातून पळून जायचा आणि गोव्यात थांबायचा.

हेही वाचा – दोडामार्ग पोलिसांची धडाकेबाज कामगिरी ; दारूसह 35 लाखांचा मुद्देमाल जप्त

आतापर्यंत जी माहिती समोर आली आहे, त्यात अनवर रात्रीच्या वेळी सावनूर इथं यायचा. एकांतात तरुणांना मारहाण करायचा आणि पैसे मिळाल्यानंतर पळून जायचा. पोलीस अनेक दिवसांपासून अनवरच्या मागावर होते. पिस्तुलाचा धाक दाखवून लोकांना लुटण्याचा धंदा करणारा अनवर शेख यानं कल्पनाही केली नसेल की ज्यांना आपण रात्रीच्या अंधारात मारहाण करतोय, ते दिवसाढवळ्या आपल्यालाच भररस्त्यात जीवे मारुन टाकतील! पण तेच झालं! सपासप कुऱ्हाड आणि कोयत्यानं वार करत ज्यांना अनवर लुटत होता, त्यांनीच त्याचा काटा काढल्याचं समोर आलंय.

हेही वाचा – धक्कादायक! हा Video पाहा आणि तुम्हीच सांगा या अपघाताला कारणीभूत कोण ते!

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!