अजून एका गव्याची शिकार

धारबांदोडा आंबेधुलय येथील घटना; गव्याला मारुन त्याचे चारही पाय आणि मुंडकं कापून नेल्याचा प्रकार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अन्नसाखळी महत्त्वाची असतं. या अन्न साखळीत मनुष्याचं अस्तित्व नसलं तरी कोणत्याची प्राण्याचं, वनस्पतीचं अडणार नाही. परंतु मनुष्य नसून एखादा किटक किंवा सस्तन प्राणी नसेल, तर पूर्ण अन्न साखळीच कोलमडून पडण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः हणजूण सुरा हल्ला, संशयिताला अटक

सरकारच्या कुचकामी धोरणामुळे गव्यांचं अस्तित्व धोक्यात

गव्या रेड्याला राज्य प्राण्याचा दर्जा मिळाल्याने गोव्यातील वन्यजीवन समृद्ध झालं आहे. गवे शेतीबागायतीचं नुकसान करतात याला फक्त गवेच जबाबदार नाहीत, तर आपलं वन आणि कृषी धोरणही तेवढंच कारणीभूत आहे. सरकारच्या एकूणच कुचकामी धोरणांमुळे गोव्याचं वैभव असलेल्या गव्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. गव्यांच्या शिकारीचं प्रमाण राज्यात वाढू लागलं आहे. गुरुवारी धारबांदोडा आंबेधुलय रस्त्यालगत अज्ञात शिकाऱ्यांनी गव्याला मारुन त्याचे चारही पाय आणि मुंडकं कापून नेल्याचा धक्कादायक आणि अमानवी प्रकार घडला आहे. त्यामुळे या भागत एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचाः गोवा खंडपीठाचे कामकाज १७ ऑगस्ट पासून नव्या इमारतीत सुरू

वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी ही मोठी समस्या

वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी ही एक मोठी समस्या बनली आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक होत चालली आहे. हस्तिदंत, गेंड्याचं शिंग आणि वाघाचे विविध अवयव यांचं चोरट्या व्यापाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. जगभरात या व्यापारातून दरवर्षी 35 हजार ते 70 हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वन्यजीवांच्या तस्करीमुळे कायदा आणि सुरक्षा व्यवस्था यासारखे प्रश्न उपस्थित होण्याबरोबरच जंगलातील त्यांच्या अशा मुक्तसंचारामुळे जंगलात राहणाऱ्या स्थानिकांच्या उपजीविकेवर परिणाम होऊ लागला आहे.

गव्यांच्या जांघ आणि पोटरीना दक्षिण गोव्यात चांगली मागणी

खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गव्यांच्या जांघ आणि पोटरीना दक्षिण गोव्यात चांगली मागणी आहे. काही लोक गव्याच्या मांसावर तुटून पडतात. या मांसाला किंमतही चांगलीच मिळते. त्यामुळे राज्यात गव्यांच्या शिकारीचं प्रमाण वाढलं आहे. काही दिवसांपूर्वी पैकुळ, सत्तरी येथे गव्याची अशाच प्रकारे हत्या करण्यात आली होती. त्याचंही शिर आणि चार पाय कापून नेण्यात आले होते. आंबेदुलय भागात गवे आणि इतर हिंस्त्र जनावरांचा मोठ्या प्रमाणात संचार असल्यानं स्थानिक लोक सहसा शिकारीच्या फंदात पडत नाहीत. त्यामुळे या गव्याची शिकार आणि मांस विक्री प्रकरणात बाहेरच्या शिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किंवा एखादी सराईत टोळी यात सहभागी असण्याची शक्यता आहे.

हेही वाचाः डिचोलीत घर फोडून एक लाखांची चोरी

आंबेदुलय येथील दाट जंगलात गव्याची हत्या

आंबेदुलय येथील दाट जंगलात गव्याची हत्या करण्यात आल्यानं सुरुवातीला तो कुणाच्या दृष्टीस पडला नाही. शुक्रवारी उशिरा वन खात्याच्या निदर्शनास ही गोष्ट येताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि शनिवारी त्याच्यावर अंतिम संस्कार केले. शिकाऱ्यांवर पाळत ठेवण्यासाठी खास कॅमेरे बसविण्याच्या हालचाली चालवल्या आहेत, अशी माहिती हाती येत आहे.

हेही वाचाः असंवेदनशीलतेचा कळस! उगेत ३ म्हशींची हत्या; 1 जखमी

गेल्या 40 वर्षांत जगातील अर्धे वन्यजीव धोक्यात

गेल्या 40 वर्षांत जगातील अर्धे वन्यजीव धोक्यात आले आहेत. हस्तिदंतासाठी 1 लाख आफ्रिकन हत्तींची हत्या, खवले मांजर हा जगभरात सर्वाधिक मारला जाणारा सस्तन प्राणी, 10 वर्षांत गेड्यांच्या शिकारीत कमालीची वाढ झाली आहे आणि आपण मात्र वन्यजीव दिन कसा चांगल्याप्रकारे साजरा करता येईल यात दरवर्षी रमलेलो असतो.

हा व्हिडिओ पहाः Video | IPS | LADY SINGHAM | आयपीएस अस्लम खान गोव्याच्या पोलिस उपमहानिरीक्षक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!