जमीन हडप प्रकरणातील आणखी एक मासा गळाला

एसआयटीने एका संशयिताच्या मुसक्या आवळल्या

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : बनावट दस्तावेज​ तयार करून जमिनी हडप करण्याच्या प्रकरणात विशेष तपास पथकाने (एसआयटी) मुख्य संशयित महम्मद सुहैल शफीला अटक केली होती. त्याची जामिनावर सुटका झाल्यानंतर एसआयटीने गोव्या‍बाहेर पळून गेलेल्या संशयितांवर कारवाई करून सुहैलच्या आणखी एका साथीदाराला कासारगोड-केरळ येथून बुधवारी ताब्यात घेतले असून त्याला पुढील दोन दिवसांत गोव्यात घेऊन येणार असल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा:राजस्थानमध्ये महिनाभरासाठी संचारबंदी, ‘हे’ आहे कारण… ‍

विशेष चौकशी पथकाची स्थापना

बनावट दस्तावेज तयार करून बेकायदेशीर पद्धतीने जमिनी हडप करून त्यांची विक्री करणाऱ्यांची कसून चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने १५ रोजी क्राईम ब्रांचचे अधीक्षक निधीन वालसन यांच्या नेतृत्वाखाली विशेष चौकशी पथकाची (एसआयटी) स्थापना केली. त्यानंतर एसआयटीने पणजी पोलीस स्थानकात गोंगुरे, आसगाव-बार्देश येथील सर्वे क्रमांक ३३/३ मधील जमीन हडप केल्याप्रकरणी दाखल तक्रारीची दखल घेऊन पुराभिलेख खात्याचे माजी संचालक, जमीन बळकावल्याच्या कालावधीत बार्देशमध्ये असलेले तत्कालीन मामलेदार व बार्देशचे तत्कालीन सब रजिस्ट्रार यांच्यासह दुर्भाट फोंडा येथील लुईझा फर्नांडिस, आयतानो फर्नांडिस, मीना रमाकांत नाईक व इतरांवर गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.
हेही वाचा:कोरोनामागोमाग आणखी भयंकर आजाराची साथ… ‍

न्यायालयाने दिली संशयितांना सशर्त जामिनावर सुटका

या प्रकरणात पथकाने १८ रोजी घोगळ-मडगाव येथील विक्रांत शेट्टी याला अटक केली होती. त्यानंतर एसआयटीने मंगळवार २१ रोजी सांतिनेझ येथील आणि मुळ चित्रदुर्ग (कर्नाटक) येथील महम्मद सुहैल शफी याला अटक केली होती. त्यानंतर एसआयटीने पुरातत्त्व खात्यातील धीरेश नाईक आणि शिवानंद मडकईकर या दोघांनाही अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने वरील चारही संशयितांना सशर्त जामिनावर सुटका केली.
हेही वाचा:’हा’ अभिनेता होता बिष्णोई गँगच्या निशाण्यावर… ‍

एसआयटी मुख्य संशयिताच्या मागावर

दरम्यान, एसआयटीने गोव्याबाहेर कारवाई करण्यासाठी केरळ येथे एक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली दोन पथक मंगळवारी केरळ येथे रवाना करण्यात आले. यातील एका पथकाने बुधवारी कासारगोड-केरळ येथून संशयित सुहैल याच्या एका साथिदाराला ताब्यात घेतला. तर दुसरे पथक आणखी मुख्य संशयिताच्या मागावर असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, एसआयटीने पुरातत्त्व खात्यात सेवा बजावणाऱ्या दाम्पत्याची जबानी बुधवारी नोंद केल्याची माहिती समोर आली.
हेही वाचा:बहुमत चाचणी स्थगितीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार… ‍

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!