बेघर झालेल्या ९३ पूरग्रस्तांना घरं बांधून देण्याची घोषणा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी केली घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: अतिवृष्टी आणि पुरामध्ये पूर्णपणे उद्‌ध्वस्त झालेली ९३ घरे रोटरी क्लबच्या सहकार्याने बांधून देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी केली. पुरामुळे अनेक घरे कोसळली. अनेक घरांचे नुकसानही झालं.

हेही वाचाः १२५ कोविडबळींच्या कुटुंबांना आज प्रत्येकी २ लाख : मुख्यमंत्री

गुरुवारी झालं मंजुरीपत्रांचं वाटप

नुकसान झालेल्या घरांना जी आर्थिक मदत सरकारने जाहीर केली आहे, त्याच्या मंजुरीपत्रांचे गुरुवारी वाटप करण्यात आलं. येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात झालेल्या या कार्यक्रम मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी बांधकाम मंत्री दीपक प्रभू पाऊस्कर, रोटरी क्लबचे अध्यक्ष गौरीश धोंड व अन्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचाः दोन डोस घेतलेल्यांना ‘आरटीपीसीआर’ची सक्ती नको!

अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांना पूराचा फटका

अतिवृष्टीमुळे सत्तरी, डिचोली आणि धारबांदोडा तालुक्यांत अनेक ठिकाणी पूर आले होते. या पुरामुळे घरांबरोबर शेती, बागायती यांचे प्रचंड नुकसान झाले. काही घरे पूर्णपणे कोसळली. जी घरे कोसळली ती रोटरी क्लबच्या सहकार्याने सरकारतर्फे बांधून दिली जातील. अशाप्रकारे सध्या ९३ घरे बांधून दिली जाणार आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

प्रत्येक 2 लाखांचा खर्च देणार

पूरग्रस्तांना घरे बांधून देण्यासाठी राज्य सरकार प्रत्येकी २ लाखांचा खर्च देईल तर, रोटरी क्लब २ लाखांचा खर्च देईल. अशाप्रकारे ४ लाख रुपयांत घरे उभारली जातील. घराचा आराखडा संबंधित कुटुंबाला दाखवून अंतिक केला जाईल. दोन महिन्यात या सर्वांना तयार घरे मिळावीत, असा सरकारचा प्रयत्न राहील, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचाः ACCIDENT | सुकतळे – मोले येथे अपघात

पडझड झालेल्या घरांसाठी मंजुरीपत्रे प्रदान

पडझड झालेल्या घरांना नुकसानीच्या अहवालाप्रमाणे ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात आली आहे. या मदतीचे मंजुरीपत्र मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. सोमवारपर्यंत त्यांच्या बँक खात्याच पैसे जमा होतील. हे पैसे जमा न झाल्यास त्वरित तलाठ्याकडे संपर्क साधावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

हा व्हिडिओ पहाः BJP | POLITICS | 22 आमदार स्वबळावर आणण्याचं ध्येय

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!