‘गोंयचो आवाज’तर्फे थिवी, कळंगुट मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर

थिवीतून स्वप्नेश शेर्लेकर, तर कळंगुट मतदारसंघातून रोशन माथाइश लढवणार निवडणूक; पत्रकार परिषदेत घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः ‘गोंयचो आवाज’ पक्षाने शनिवारी दोन नवीन उमेदवारांची घोषणा केलीये. फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर हे उमेदवार जाहीर करण्यात आलेत. गोंयचो आवाजतर्फे स्वप्नेश शेर्लेकर हे थिवी मतदारसंघातून, तर रोशन माथाइश हे कळंगुटमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं पक्षाकडून जाहीर करण्यात आलंय. शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलीये.

हेही वाचाः सेंट जासिंतो बेटावर तिरंगा फडकवण्यासाठी विरोध करणाऱ्यांवर कारवाई करा

उत्तर गोवा अराजकतेचं केंद्र बनलंय

उमेदवारांची ओळख करून देताना गोंयचो आवाज पक्षाचे राज्य संयोजक कॅप्टन विरियटो फर्नांडिस म्हणाले, स्वप्नेश आणि रोशनला कोणत्याही परिचयाची गरज नाही. गोवा टिकवण्यासाठी ते अनेक लढ्यांमध्ये आघाडीवर आहेत. वेळोवेळी, त्यांनी त्यांची क्षमता सिद्ध केली आहे. दुर्दैवाने उत्तर गोवा अराजकतेचं केंद्र बनलं आहे. इथे देशभरातील गुन्हेगारांना मनाप्रमाणे वागण्याचं जणू स्वातंत्र्यच मिळालं आहे. गोंयचो आवाज कळंगुट आणि थिवी मतदारसंघावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये या दोन्ही मतदारसंघात गोंयचो आवाज पक्षाचेच उमेदवार निवडून येणार, यासाठी आमचे कार्यकर्ते प्रयत्नशील असणार आहेत.

‘गोंयचो आवाज’ गोव्यातील राजकारण स्वच्छ करण्यासाठी कटिबद्ध

‘गोंयचो आवाज’ गोव्यातील राजकारण स्वच्छ करण्यासाठी कटिबद्ध आहे. गोव्यातील लोकांना माझी एक नम्र विनंती आहे की त्यांनी प्रामाणिक आणि चांगलं चारित्र्य असलेल्या उमेदवारांनाच आगामी निवडणुकीत निवडून आणावं, असं आवाहन फर्नांडिस यांनी यावेळी केलं.

हेही वाचाः ध्वजारोहणाला विरोध करणाऱ्यांवर कारवाई व्हावीः गुदिन्हो

गोव्याच्या राजकारणात बदल घडवून आणण्याची गरज

गेल्या काही वर्षांपासून गोव्यात भ्रष्ट राजकारण्यांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी उलथापालथी केल्यात. स्वतःच्या स्वार्थासाठी गोव्याला विकायला काढलंय. परिणामी, कोविड महामारीमध्ये गोव्याला आणि पर्यायाने गोंयकारांना अनेक त्रासांना सामोरं जावं लागलं. निष्पाक गोंयकारांचे बळी गेले. गुन्हेगारीत लक्षणीय वाढ झाली, बेरोजगारी आली आणि अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली. ही परिस्थिती बदलण्यासाठी गोव्याच्या राजकारणात बदल घडवून आणण्याची गरज आहे, असं फर्नांडिस यांनी म्हटलंय.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | DENGUE | वास्को, दाबोळी, मुरगावमध्ये डेंग्यूच्या रुग्णांत वाढ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!