तौक्ते पिडीतांच्या मदतीला धावले अंकित चौधरी

मदतीसाठी संपर्क करण्याचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः तौक्तेने ज्यांच्या डोक्यावरचं छप्पर नेलं, त्यांना तात्पुरता आसरा आम्ही आमच्या हॉटेल्समध्ये देऊ, असं अंकित चौधरींनी गोवन वार्ता लाईव्हशी बोलताना सांगितलं. निसर्ग कोपला की माणसाचं कसं आणि किती नुकसान होऊ शकतं हे पुन्हा एकदा तौक्ते चक्रीवादळाने दाखवून दिलंय. रविवार राज्यात येऊन धडकलेलं तौक्ते चक्रीवादळ बघता बघता होत्याचं नव्हतं करून गेलं. या चक्रीवादळामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पडझड तर झालीच. पण अनेकांच्या डोक्यावरचं छप्पर हे चक्रीवादळ स्वतःसोबत घेऊन गेलं.

हेही वाचाः भारतासाठी 6-18 महिने चिंतेचे; WHOच्या शास्त्रज्ञाचा इशारा

आमच्याशी संपर्क करा

मूळ मुंबईचे आणि गेली 9 वर्षं गोव्यात वास्तव्यात असलेले अंकित चौधरी सामाजिक बांधिलकी जपताना तौक्ते पिडीतांसाठी पुढे आलेत. कुणाच्याही पाठिंब्याशिवाय ते तौक्ते पिडीतांच्या मदतीसाठी उभे राहिलेत. ज्यांच्या डोक्यावरचं छप्पर तौक्ते चक्रीवादळात नाहीसं झालं, त्यांना तात्पुरतं छप्पर देण्याची तयारी या तरुणाने दाखवली आहे. त्यासाठी 9136899997 या क्रमांकावर संपर्क करण्याचं आवाहन या तरुणाने केलंय.

हेही वाचाः तौक्तेने केलं वीज खात्याचं सर्वात जास्त नुकसान

हॉटेल्समध्ये करणार राहण्याची सोय

अंकित चौधरी हे हॉटेल व्यवसायाशी जोडलेले आहेत. त्यांच्या या सामाजकार्यात आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी त्यांच्या पार्टनर्स तसंच मित्रांची हॉटेल्स पुढे आलेत. तौक्ते पिडीतांच्या मदतीची सुरुवात मी मोरजीतील आमचं रोपोपो या हॉटेलपासून करायचं ठरवलं. पण आता माझे पार्टनरचं बागातील ‘क्लब ताओ’ तसंच मी पूर्वी जिथे काम करायचो ते दक्षिण गोव्याच्या कांसावली ‘द बायक ओल्ड एन्कर रिसॉर्ट’ यांनीदेखील तौक्ते पिडीतांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केलीये. त्यामुळे आत्ताच्या घडीला ज्यांच्याकडे राहण्याची सोय नाहीये त्यांची या ठिकाणी सोय होऊ शकते, असं चौधरींनी सांगितलं. तसंच येणाऱ्या काळात तर अजून लोकांना मदतीची गरज भासली तर आम्ही जशी मदत करता येईल तशी करणार आहोत. सद्या आम्हाला कुणाचं आर्थिक पाठबळ नसल्यानं आम्ही फक्त तात्पुरतं छतच देऊ शकतो.

हेही वाचाः मगोच्या कार्यालयात यावं, मदत केली जाईल

कोविडबाधितांसाठीही चौधरीं करतात काम

कोविड महामारी सुरू झाल्यापासून कोविडबाधितांसाठीही चौधरी जमेल तशी मदत करत आहेत. Covid care goa.in या स्वयंसेवी ग्रुपच्या माध्यमातून ते कोविडबाधितांसाठी स्वेच्छेने काम करतायत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!