डिचोली भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी अनिकेत चणेकर

समिती जाहीर; निवडणुकीसाठी तयारीला गती

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः डिचोली भारतीय जनता युवा मोर्चाची नवीन समिती सभापती तथा डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर आणि भाजयुमोचे राज्य अध्यक्ष समीर मांद्रेकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली असून युवानेते तथा नगरसेवक अनिकेत चणेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. नवीन समिती ही सर्वांना विश्वासात घेऊन निवडण्यात आली असून या समितीतर्फे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचं जोरदारपणे कार्य करून डिचोली मतदारसंघात पुन्हा भाजपचे कमळच फुलविणार, असं यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष अनिकेत चणेकर यांनी सांगितलं. 

हेही वाचाः जनसेवा हीच नारायण सेवा: सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य

यावेळी व्यासपीठावर सभापती राजेश पाटणेकर, भाजयुमोचे राज्य अध्यक्ष समीर मांद्रेकर, नगराध्यक्ष कुंदन फळारी, वल्लभ साळकर, तुळशीदास परब, महिला अध्यक्षा शर्मिला पळ, डिचोलीचे प्रभारी संतोष मळीक,  उत्तर गोवा सचिव शिवदत्त तेंडुलकर, उत्तर गोवा भाजयुमोचे अध्यक्ष उर्वेश रेडकर, डिचोली मंडळ अध्यक्ष विश्वास गावकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर आणि इतरांची उपस्थिती होती.

हेही वाचाः कांदोळीत ‘सीआरझेड’मधील बांधकामं पाडली

भाजयुमोची डिचोली मतदारसंघ समिती

भाजयुमोची डिचोली मतदारसंघ समिती पुढीलप्रमाणेः अध्यक्ष अनिकेत चणेकर, सरचिटणीस मकरंद परब, उपाध्यक्ष देविप्रसाद भट, अक्षय नाईक, श्रध्दा धोंड, सचिव सिया बीर्जे, साईश रेडकर, सदस्य तन्वी पळ, सुजाता तेलगिरी, साधन आरोंदेकर, सचिन साळकर, प्रितम पणजीकर, भुपेन पाटणेकर, ओमकार डंगी, अमय परब, हरीष गावकर, अमित गावकर, रोहित मोपकर, समीर घाडी, चेतन धुमे, तुषार फळारी, निखिल पालव, रूणाल गावकर, अक्षता सिंह, सिध्दी गावकर, शुभश्री फळारी, धनंजय पळ, कविता लाड, तेजा तेली, क्षितिज वेंगुर्लेकर, विठ्ठल राऊत, सोनिया गावकर, अनिक्षा गोवेकर, अजिंक्य नेवगी, अनिरुद्ध तेली, मोहन कळंगुटकर, आकाश शिरगावकर, रोहित पळ, निकिता धारगळकर, अली शेख, निलेश ताटे, कौशिक गावस, श्रीरंग कोठंबिकर, दिनेश पेडणेकर, अमय गावकर, सुर्या गावस, रजत राणे, अजय गावस, प्रवीण मांद्रेकर, प्रथमेश आमोणकर, प्रकाश वरक, दिप्तेश नाईक, आकाश राऊत, मुक्तेश रायकर, सुमंत तेली, नेहा, रूद्रेश गावकर, दत्तेश खर्बे.

हेही वाचाः काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव आज गोव्यात

यावेळी राज्य अध्यक्ष समीर मांद्रेकर यांच्यासह, शिल्पा नाईक, नगराध्यक्ष कुंदन फळारी, उर्वेश रेडकर आदींनी आपले विचार मांगले. नवीन समितीला शुभेच्छा व्यक्त करताना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम जोरदारपणे करून डिचोली मतदारसंघात भाजपचा विजय आणि पर्यायाने राज्यात भाजप सरकार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!