…अन ‘ते’ कुटुंब अखेर चार दिवसांनी पोहोचलं हॉस्पिटलमध्ये !

काँग्रेस नेते सचिन परब यांची मदत ठरली लाखमोलाची !

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणे : मोरजी गावडे वाडा इथल्या एका कुटुंबातल्या चारही व्यक्ती आजारी होत्या. कोरोनाची भीती होती. चार कुटुंबीय, त्यात वयोवृद्ध महिलेला खोकला, थंडी मोठ्या प्रमाणात होती. दोन मुली व एक जावई अशा चार जणांना तुये हॉस्पिटलमध्ये मागील चार दिवसापासून जायचे होते. त्यासाठी त्याना वाहन हवे होते, पण गाडी कोण घेवून येणार आणि कोण आम्हाला हॉस्पिटलमध्ये नेणार? या विवंचनेत हे कुटुंब होते. अनेकाकडे त्यांनी वाहनासाठी मागणी केली मात्र कुणी धावून आलं नाही. याबाबतची माहिती मांद्रेचे काँग्रेस नेते सचिन परब यांच्या कानी पडली. त्यांनी तातडीने मोरजीतील कार्यकर्त्याना संपर्क साधून वाहन उपलब्ध करण्याची विनंती केली. वाहन होते मात्र चालक मिळत नव्हता. ही अडचण लक्षात घेवून सचिन परब यांनी १५ रोजी वाहन उपलब्ध केले आणि या कुटुंबाला तुये हॉस्पिटलमध्ये कोरोना तपासणीसाठी नेले. त्यातील वयोवृद्ध महिला व एका मुलीचा प्राथमिक कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. दरम्यान, या घटनेबाबत पत्रकारांशी बोलताना सचिन परब म्हणाले की, हा काळ कोरोनाचा काळ आहे. एकमेकांना मदत करत या संकटावर मात केली पाहिजे. संघटीत आणि सुरक्षित राहून यावर याला तोंड दिलं पाहिजे. या कुटुंबाला पुढील काही मदत लागली तर आपण ती करायला तयार असल्याचंही सचिन परब यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!