…आणि भर कोर्टात दिलीपकुमार म्हणाले, ‘होय, मधुबाला मला आवडते !

किस्सा प्रेमकहाणीचा...दिलीपसाब आणि मधुबाला यांच्या !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांच्या निधनानंतर त्यांचे चाहते त्यांना मिस करत असून, त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत आहे. दिलीपकुमारांची अशीच एक आठवण म्हणजे, मधुबालावर त्यांनी केलेल्या प्रेमाची कथा आजही तरुणांच्या चर्चेचा विषय ठरतो.

मधुबाला आणि दिलीपकुमार यांची प्रेमकथा 1951 च्या ‘तराना’ चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि प्रेम झालं. मधुबालाने प्रेम व्यक्त करण्यासाठी दिलीप कुमार यांच्या मेक-अप रूममध्ये चिठ्ठीसोबत गुलाबाचं फुल पाठवलं. ज्यात लिहलं होतं, ‘जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर हा गुलाब स्वीकारा.’ दिलीपकुमारांनी गुलाबाचं फुल घेत मधुबाला च्या प्रेमाचं स्वीकार केला. पुढे हे प्रेमप्रकरण एवढ वाढलं की, दिलीपकुमार आपल्या चित्रपटाचे शूटिंग सोडून मधुबालाच्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या ठिकाणी जाऊन पोहोचत असत.

सगळं सुरळीत सुरु असताना मधुबालाचे वडील अताउल्ला खान यांची या प्रेमप्रकरणात एंट्री झाली. खान यांनी आपल्या मुलीवर बारीक नजर ठेवली. त्यांच्या हस्तक्षेपामुळे दिग्दर्शकही अस्वस्थ झाले. जेव्हा बी.आर. चोपडा मधुबाला आणि दिलीपकुमार यांच्यासमवेत ‘नया दौर’ चित्रपटाचे शूटिंग करत होते, तेव्हा प्रकरण अधिकच चिघळलं, चोपडा यांना भोपाळजवळ दिलीप आणि मधुबाला याचं आउटडोर शूटिंग करायचं होतं. मात्र यासाठी खान यांनी परवानगी दिली नाही आणि विरोध केला. त्यामुळे चोपडा यांनी, मधुबालाऐवजी वैजयंतीमाला यांची निवड केली आणि मधुबालाचा कट लावलेला फोटो वृत्तपत्रात छापून आणला. त्याला उत्तर म्हणून खान यांनी सुद्धा मधुबालाच्या सर्व चित्रपटांची नावे लिहीत ‘नया दौर’ चित्रपटाच्या नावासमोर कट मारून फोटो वृत्तपत्रात छापून आणला.

पुढे हे प्रकरण एवढ वाढलं की थेट कोर्टात पोहोचलं. जेव्हा दिलीपकुमार यांची सुनावणीदरम्यान साक्ष झाली तेव्हा, ते कोर्टात म्हणाले, ‘होय, मला मधुबाला आवडते, माझं तिच्यावरंच प्रेम असंच कायम राहील’, पण त्यांच्या नात्यात पुढेही चढउतार चालूच राहिले. एक दिवस असा आला जेव्हा दोघांना नातेसंबंध टिकवणे कठीण झालं आणि ही प्रेमकथा संपुष्टात आली. नंतर पुढे दिलीपकुमार यांनी सायरा बानो यांना आपला जीवनसाथी म्हणून निवडले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!