धावत्या रेल्वेतून पडून एक अज्ञात इसम ठार

बाळ्ळी रेल्वे स्थानकाजवळील घटना

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः धावत्या रेल्वेतून पडून एक अज्ञात इसम ठार झाला. ही घटना बाळ्ळी रेल्वे स्थानकाजवळ रविवारी घडली.

पोलीस घटनास्थळी दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळ्ळीजवळील रेल्वे एका अज्ञात इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळताच उपनिरीक्षक अरुण तटेकर आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तिथे त्यांना इसम रेल्वे रूळाजवळ पडलेला दिसला.

मयताचे वय अंदाजे ६० वर्षे

मयताचे वय अंदाजे ६० वर्षे इतके असावे. धावत्या रेल्वेतून पडून त्याचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. मयताच्या कपड्यांची तपासणी केली तेव्हा मयताच्या खिशात कोणतेही ओळखपत्र सापडले नाही. ओळख पटविण्याच्या हेतूने सध्या मृतदेह शवागृहात असल्याची माहिती पोलिसानी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!