मांद्रेत मनोरंजन पार्क म्हणजे पर्यावरणाची हानीच

रिव्होल्यूशनरी गोवन्सचे नेते मनोज परबांची टीका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणेः हल्लीच सरकारने मांद्रे गावचा कायापालट करण्याचं ठरवलं आहे. मांद्रेतील राखीव जागेवर
गोवा सरकार मनोरंजन पार्क बनवत आहे, असे जीटीडीसीचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार दयानंद सोपटेंनी सांगितलं. हा मनोरंजन पार्क म्हणजे पर्यावरणाची हानीच, अशी टीका रिव्होल्यूशनरी गोवन्सचे (आरजी) नेते मनोज परबांनी केलीये. शनिवारी आरजीकडून पेडण्यात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी परब बोलत होते.

हेही वाचाः मांद्रे मतदारसंघातून सचिन परब यांच्या दावेदारीला मांद्रे गट काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा

पेडणेकरांना खोटी आश्वासनं का देता?

प्रत्येकवेळी लोकांना काम देण्याचं खोटं आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल का करतात, त्यांच्या भावना का दूखवता, असा प्रश्न परबांनी यावेळी दयानंद सोपटे आणि मनोहर आजगावकरांना केलाय. मोपा विमानतळाच्या वेळीही लोकांना हीच खोटी आश्वासनं देण्यात आली, ज्यावर अजूनपर्यंत काहीच झालेलं नाही, असं परब म्हणालेत.

हेही वाचाः गोंयकारांची मतं विक्रीसाठी नाहीत; भाजप-काँग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आली आहे

मांद्रेत मनोरंजन पार्कची गरज नाही

मनोरंजन पार्क बनवण्याचा निर्णय एका बैठकीत घेतला गेला. या बैठकीत ठरवण्यात आलं की जीटीडीसीसाठी जागा रेव्हेन्यू डिपार्टमेंटद्वारे येत्या सहा महिन्यात मिळवण्यात येणार आहे. हे पार्क म्हणे १.६४ लाख चौरस मीटरवर बनवलं जाईल आणि या पार्कची पायाभरणी येत्या १९ डिसेंबर रोजी केली जाईल, अशी माहिती पर्यटन मंत्री मनोहर आजगावकरांनी दिली होती. मनोरंजन पार्कसारखे प्रकल्प आणल्यावर त्यात कॅसिनो, क्लबसारख्या गोष्टी येतील. या प्रकल्पामुळे गावातल्या बायका मुलींच्या सुरक्षेचा विचार तुम्ही केलेला दिसत नाही. मुळात या गावात मनोरंजन पार्कची गरज आहे असं वाटत नाही. त्यापेक्षा मांद्रे मतदारसंघात ज्या लोकांना राहायला घरं नाहीत त्या लोकांसाठी हजार चौरस मीटरची जागा तुम्ही गरजू लोकांना देऊ शकतात. पण तुम्ही त्या लोकांची पर्वा करणार नाही. कारण तुम्हाला फक्त तुमचा फायदा दिसतो, असं परब म्हणालेत.

हेही वाचाः कोरोना आकडेवारी! मृत्यू पुन्हा वाढले, 7 रुग्ण दगावले

आरजी मांद्रे गावात मनोरंजनाच्या नावाने पर्यावरणाची हानी होऊ देणार नाही, असं परबांनी सांगितलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!