गावकरवाडा – डिचोलीत मगरीची सुखरूप सुटका

अमृत सिंग यांनी दिलं मगरीला जीवदान

Goan Varta Live | प्रतिनिधी

डिचोलीः रविवारपासून राज्यात पावसाने जोर धरलाय. उत्तर तसंच दक्षिण गोव्याला पावसाने झोडपून काढलंय. मंगळवार तसंच बुधवार असे दोन दिवल पडलेल्या मुसळधार पावसामुळे डिचोली भागात नद्यांची पातळी उंचावली आहे आणि पाणी रस्त्यावर आलं आहे. या पाण्यासोबत गुरुवारी गावकरवाडा-डिचोलीत मगर रस्त्यावर येऊन गेटमध्ये अडकल्याचा प्रकार घडला.

गावकरवाडा येथे सापडली मगर

डिचोली भागात नदीच्या पाण्याची पातळी वाढून पाणी रस्त्यावर आलंय. या पाण्यासोबत गावकरवाडा येथे गणपती विसर्जनाच्या ठिकाणी गुरुवारी सकाळी भली मोठी मगर रस्त्यावर आली आणि एका गेटमध्ये अडकली. गेटमध्ये अडकल्याने ती आपली सुटका करण्यासाठी तडफडत होती. प्राणी मित्र अमृत सिंग यांनी या मगरीची सुखरूप सुटका केली. तसंच तिला वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडे सुपुर्द केलं. ही मगर 8.10 फूट लांब असल्याचं समजतंय.

अजून मगरी असण्याची शक्यता

अमृत सिंग यांच्या मते मगर सापडलेल्या ठिकाणी अजूनही काही मगरी असण्याची शक्यता आहे. तसंच तिथेच जवळ त्यांचा निवारा असण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही. तरीही लोकांनी घाबरून जाऊ नये. कारण मगर माणसांना त्रास देत नाही, असं अमृत सिंग यांनी सांगितलंय. आज मगरींबाबत जागरूकतेची गरज आहे. लोकांनी समजून घेणं आवश्यक आहे. मडकई गावात मगरींची पुजा केली जाते, अशी माहिती अमृत सिंग यांनी दिलीये.

काही दिवसांपूर्वी अस्नोडा येथे दिसली होती मगर

4 मे रोजी अस्नोडा – पारार येथे भली मोठी मगर रस्त्यावर फिरताना आढळून आली होती. या मगरीचा व्हिडीओ सोशल मीडिया, व्हॉट्सअप ग्रूपवर चांगलाच वायरल झाला होता. गुरुवारी 15 जुलै रोजी बंदिरवाडा – डिचोलीत मगर दिसली आहे. यावरून असंच म्हणावं लागेल की डिचोली भागात मगरींची संख्या वाढली असून त्या आता रस्त्यावर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Heavy Rain | Bicholim | मुसळधार पावसाचा डिचोली, साखळीत जोर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!