मुख्यमंत्री- आरोग्यमंत्री राफेल फाईल्सचा भांडाफोड करण्याची अमित शहांना भीती

चोडणकरांची टीका; गृहमंत्री अमित शहांची मुख्यमंत्री- आरोग्यमंत्र्यांच्या कमिशन वाटणीत मध्यस्थी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भारतीय जनता पक्षाला लोकांचे होणारे हाल व कष्टांचं काहीच पडलेलं नाही. केवळ लोकांच्या आजाराचा बाजार करण्याचं त्यांचं धोरण परत एकदा समोर आलं आहे. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कपाटात असलेल्या राफेल घोटाळ्यातील फाईल्सचा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे भांडाफोड करतील या भीतीनेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यामधील अंदाजे रु.२२ कोटी ५९ लाख रुपयांच्या आयव्हरमेक्टिन गोळ्यांच्या खरेदीवरील कमिशन वाटणीत मध्यस्थी केली, असं कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः भंडारा वनपरिक्षेत्रात खळबळ; एकाचवेळी वाघाचे तीन बछडे आणि अस्वल मृतावस्थेत आढळले

म्हणून अमित शहा मध्यस्ती करण्यासाठी पुढे आले

आज गोव्यात ऑक्सिजन अभावी लोकांचे प्राण जात असताना त्यावर तोडगा काढण्यासाठी भाजप नेतृत्वाला वेळ नाही. गृहमंत्री अमित शहानी गोव्यात संपूर्ण लॉकडाऊन करा अशी लोकांची मागणी ऐकली नाही. गोव्यात आज लसींचा तुटवडा आहे, त्यावर बोलायला अमित शहांना वेळ नाही. कोविड लसीकरणासाठी केंद्राकडून सहाय्य देण्याबद्दल अमित शहा काहीच बोलत नाहीत. परंतु, मोदी सरकारचं बिंग फुटेल या भीतीने राफेल फाईल्सचा आरोग्यमंत्री भांडाफोड करतील या भीतीने डॉ. प्रमोद सावंत व विश्वजीत राणे यांच्यामध्ये मध्यस्थी करण्यास केंद्रीय गृहमंत्री पुढे आले, असं गिरीश चोडणकर म्हणाले.

हेही वाचाः SET: सेटची परीक्षा 26 सप्टेंबरला; ‘या’ तारखेपासून अर्ज नोंदणीला सुरुवात

मोदी-शहांना मृत्यूबद्दल काहीच भावना नाही

गोव्यात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे प्राण गेलेले मृत आणि त्यांचे नातेवाईक यांच्याप्रती केंद्रीय गृह मंत्री एक शब्द बोलले नाहीत हे दुर्देवी आहे. गोमंतकीयांप्रति सहवेदना व्यक्त करण्यास ते विसरले. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून गोव्याचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांवर कारवाईची कोणतीच अपेक्षा नाही. भाजपचे मोदी-शहा यांनीच हाताला रक्त लावून सत्ता काबीज केली होती हे सर्वांनाच माहीत आहे. त्या दोघांनाही मृत्यूबद्दल काहीच भावना नाहीत.

हेही वाचाः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धावले गोव्याच्या मदतीला !

राष्ट्रहिताचा विचार करणं कॉंग्रेसची संस्कृती

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून शिकणं गरजेचं आहे. गोव्यात ऑक्सिजनच्या अभावामुळे मरण आलेल्यांप्रती राहुल गांधी यांनी दु:ख व्यक्त केलं आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. त्यापुढे जाऊन कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून सर्वांनी राष्ट्रहिताचा विचार करून प्रयत्न करावेत असं आवाहन केलं. कॉंग्रेस पक्षाची ही संस्कृती आहे, असं गिरीश चोडणकर यांनी म्हटलं आहे.

हेही वाचाः सीएम- एचएमचं पॅचअप !

हिम्मत असेल तर भ्रष्ट भाजप सरकारने जाहीर करावं

भाजप सरकारने गोव्यात कोविड आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आयव्हेरमेक्टिन गोळ्या लोकांना देण्याचा निर्णय कोणाच्या सल्ला घेऊन आरोग्यमंत्र्यांनी घेतला हे विश्वजीत राणे यांनी स्पष्ट करावं, अशी मी परत एकदा मागणी करतो. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री ही माहिती द्यायला का घाबरतात? सदर गोळ्या विकत घेण्यासाठी निवीदा जारी केली होती का आणि सदर कंत्राट कोणत्या कंपनीला देण्यात आलं हे हिम्मत असेल तर भ्रष्ट भाजप सरकारने जाहीर करावं, अशी मागणी गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

हेही वाचाः 2000 रुपयांची नोट झाली गायब; सरकारकडून छापणं बंद

मुख्यमंत्र्यांच्या संगनमताने आरोग्यमंत्र्यांनी केलेला घोटाळा

जागतिक आरोग्य संघटनेने आयव्हरमेक्टिन गोळ्यांचं सेवन केवळ आरोग्य चाचणीनंतरच करावं असं परत एकदा स्पष्ट केलं आहे. भाजप सरकारने “आजाराचा बाजार” करण्याच्या कलेवर प्रभुत्व मिळवलं आहे. भाजप सरकारकडे लोकांना मोफत लस देण्यास निधी नाही. परंतु, कोणताही वैज्ञानीक आधार नसताना तसंच वैद्यकीय तज्ञाचा सल्ला न घेता केवळ कमिशन खाण्याच्या उद्देशाने हे सरकार कोविड प्रतिबंधात्मक उपायाच्या नावाने आयव्हरमेक्टिन गोळ्या खरेदी करतं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांच्या संगनमताने आरोग्यमंत्र्यांनी केलेला हा घोटाळा आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!