ऑनलाइन वेशभूषा स्पर्धेत अमेय शेटगांवकर पेडणे तालुक्यात प्रथम

विद्या वर्धिनी प्राथमिक विद्यालय, तुये-पेडणे आणि पेडणे तालुका भाग शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचं आयोजन

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोपाळकाल्याच्या निमित्ताने ‘राधा-कृष्ण’ या विषयावर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा विद्या वर्धिनी प्राथमिक विद्यालय, तुये-पेडणे आणि पेडणे तालुका भाग शिक्षणाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मोरजीतील विद्याप्रसारक प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्याने बाजी मारली आहे.

हेही वाचाः नीट पीजी परीक्षेचं प्रवेशपत्र जाहीर, डाऊनलोड कसं करायचं?

अमेय नरसिंह शेटगांवकर या विद्यार्थ्याने मारली बाजी

पेडणे तालुका मर्यादित प्राथमिक गट ऑनलाइन वेशभूषा स्पर्धेत मोरजीतील विद्याप्रसारक प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थी अमेय नरसिंह शेटगांवकर याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालं आहे. त्याला शाळेतील शिक्षक शुभम चंद्रकांत साळगांवकर यांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन लाभलं.

सर्वांकडून कौतुक

त्याच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप मेथर, विद्याप्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष विश्राम शेटगांवकर, पालक शिक्षक संघटनेच्या अध्यक्ष आणि मोरजी गावच्या सरपंच वैशाली शेटगांवकर, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांकडून त्याचं कौतुक होत आहे.

हा व्हिडिओ पहाः SHOCKING| मडगावातील राम मनोहर लोहियांच्या पुतळ्याची विटंबनाहा व्हिडिओ पहाः

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!