मुरगाव तालुक्यातील गरजूंसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू

Goan Varta Live | प्रतिनिधी
वास्कोः इंडियन मेडिकल असोसिएशनाच्या मुरगाव शाखेतर्फे मुरगाव तालुक्यातील गरजू लोकांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यात आली. सदर रुग्णवाहिका राजाराम व ताराबाई बांदेकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे देण्यात आली आहे.
हेही वाचाः स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी ‘या’ पंचायतीने दिले 20 हजार
रुग्णवाहिका समितीची स्थापना
मुरगाव शाखेचे आश्रयदाते डॉ. ग्लेडस्टोन डिकोस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली एक रुग्णवाहिका समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश कामत असून डॉ. कपिल तळावलीकर, डॉ. मयुर पै, मुरगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. रवी कृष्णा हे सदस्य आहेत. सदर समिती रुग्णवाहिकेचे दैनंदिन व्यवस्थापन पाहणार आहे.
हेही वाचाः स्तनदा मातांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा द्या ; केंद्राची सुचना
लाईफ सपोर्टने सुसज्ज रुग्णवाहिका
सदर रुग्णवाहिका लाईफ सपोर्टने पूर्णपणे सुसज्ज आहे. ऑक्सिजन सिलेंडर्स, मल्टीपारा मॉनिटर, सक्शन मशीन आणि इतर जीवन वाचविणारी औषधं तसंच उपकरणं या रुग्णवाहिकेत आहेत. आरएनएसबी ट्रस्टचे प्रतिनिधी संतोष महाले यांनी रुग्णवाहिकेची चावी डॉ. ग्लेडस्टोन डिकोस्टा यांच्याकडे सुपुर्द केली. सदर रुग्णवाहिका दिवसरात्र रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल. ही रुग्णवाहिका ना नफा तत्वावर चालविण्यात येणार आहे.
हेही वाचाः बलात्कार प्रकरणातील तेजपालला हायकोर्टाची नोटीस
संपर्क क्रमांक
रुग्णवाहिका उपलब्ध व्हावी यासाठी 7507197010 किंवा 9850450805 या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन रुग्णवाहिका समितीकडून करण्यात आलंय.