शिवोली येथील ‛अमा स्टेज अँड ट्रेल्स व्हिला, गोवा’ ने पटकावला वर्षातील सर्वोत्कृष्ट व्हिला पुरस्कार…

मेक माय ट्रिपद्वारे ‛भारतातील सर्वात जास्त पसंत केलेला होमस्टे’ पुरस्कार सोहळा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (आयएचसीएल) ने अमा स्टेज अँड ट्रेल्स व्हिला, शिवोली, गोवा येथे राबविलेल्या होमस्टेच्या नवीन संकल्पनेला वर्षातील सर्वोत्कृष्ट व्हिला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना नुकत्याच झालेल्या भारताच्या आवडत्या होमस्टे पुरस्कार (आयएफएचए) सोहळ्यात ‛मेक माय ट्रिपद्वारे ‘व्हिला ऑफ द इयर’ हा पुरस्कार देण्यात आला. हा सोहळा दोना पावलाला येथील ताज रिसॉर्ट आणि कन्व्हेन्शन सेंटर येथे उत्साहात पार पडला. आयएफएचए हा देशांतर्गत पर्यटन बाजारात होमस्टे होस्टच्या वाढत्या समुदायाला ओळखण्यासाठी आणि पुरस्कृत करण्यासाठी लोकांची निवड असलेला पुरस्कार आहे.

या प्रसंगी बोलतांना, आयएचसीएल गोवाचे वरिष्ठ उपाध्यक्ष श्री व्हिन्सेंट रामोस म्हणाले की, “हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाल्याने आम्ही सन्मानित झालो आहोत. कोविड महामारीनंतर खाजगी ठिकाणी मुक्काम आणि स्थानिकतेच्या अनुभवामुळे होमस्टे क्षेत्राने गती घेतली आहे. अमा स्टेज अँड ट्रेल्स हे होम स्टे बाजारातील भारतातील पहिले ब्रँडेड उत्पादन आहे. आमच्याकडे सध्या गोव्यात ९ व्हिला आहेत . याशिवाय आम्ही नवीन गोष्टी देऊन ब्रँडचा विस्तार करण्याचे काम करत आहोत.”

१९४० मध्ये बांधलेले, व्हिला शिवोली उत्तर गोव्यात, मूळ शिवोली गावात आहे. येथे पूर्वीच्या काळातील गोवा-पोर्तुगीज वास्तुकला आणि घरासारखा आनंद देण्यासोबतच आधुनिक सुखसोयी यांचा मेळ घालणारा आकर्षक पाच बेडरूमचा व्हिला आहे. मॅनिक्युअर लॉन, पक्की पायवाट आणि उघड्या तुळईच्या छतासह तिरकस लाल टाइलच्या छताने वेढलेले, हे भव्य व्हिला जाळीदार व्हरांड्याने पाहुण्यांचे स्वागत करते. लाकडी दारे, कमानी आणि जुन्या काळातील टाइल्स या समकालीन सुविधांना पूरक आहेत. याशिवाय मॉडिश अंतरंग ( डेकोर) आणि डोळ्यात भरणारे फर्निचर आरामदायी जागा तयार करतात.

याव्यतिरिक्त, अमा स्टेज अँड ट्रेल्स ,अंबिका व्हिलाज ,त्रिवेंद्रम ,केरळ यांनी ‘हेरिटेज होमस्टे ऑफ द इयर’ हा पुरस्कार जिंकला आहे. दरवर्षी आयोजित केला जाणारा, आयएफएचए हा भारतातील पहिला प्रवासी निवड पुरस्कार आहे जो भारतातील ऑनलाइन प्रवासी उद्योगातील अग्रणी असलेल्या मेक माय ट्रिपद्वारे केवळ होमस्टे प्रॉपर्टी आणि होस्टसाठी आहे. पुरस्कार विजेत्यांची  निवड ज्युरी मूल्यांकन आणि ग्राहक मतांच्या संयोजनाद्वारे केली जाते.

अमा (amã) स्टेज आणि ट्रेल्स बद्दल

अमा (amã) स्टेज आणि ट्रेल्स ही इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड ( आयएचसीएल )ची होमस्टेची एक नवीन संकल्पना आहे.  अमा स्टेज आणि ट्रेल्स होमस्टे चंदीगड, गोवा, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल मधील विविध ठिकाणी उपलब्ध आहे. नवीन बंगल्यांच्या समावेशासह, ब्रँडकडे सध्या ८२ बंगल्यांचा पोर्टफोलिओ आहे तसेच ३५ बंगले विकासाधीन आहेत. जुन्या ठिकाणी हेरिटेज बंगल्यांमध्ये साधे जीवन जगण्यापासून ते अस्पर्शित पायवाटा आणि स्थानिक खाद्यपदार्थ शोधण्यापर्यंत ‛अमा स्टेज अँड ट्रेल्स’ हे जणू तुमचे  घरापासून दूर असणारे दुसरे घर आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!