Goa | अपघातातील पीडित कुटुंबाला २ लाख प्रदान

मुख्यमंत्री, वाहतूक मंत्र्यांच्या हस्ते २३ लाभार्थ्यांना धनादेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : रस्ता अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला प्रत्येकी दोन लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांच्या हस्ते देण्यात आला. साेमवारी पर्यटन भवन येथील सभागृहात आयाेजित केलेल्या कार्यक्रमात  एकूण २३ लाभार्थ्यांना हे धनादेश देण्यात आले.
हेही वाचा:Goa Free Wifi | राज्यात २० ठिकाणी मोफत ‘वाय-फाय हॉटस्पॉट’, वाचा सविस्तर…

२३२ जणांना लाभ मिळणार

२०१३ पासून ही याेजना सुरू झाली हाेती. पण, मागील अनेक वर्षे ही योजना बंद हाेती. अनेक पीडित कुटुंबांनी यासाठी अर्जही केले होते. पण, आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पुढाकाराने २३२ जणांना हा लाभ मिळणार आहे. एकूण ४ कोटी ६४ लाख रुपये यासाठी देण्यात येणार आहेत. सोमवारी फक्त २३ जणांना हे धनादेश देण्यात आले. लवकरच उरलेल्या सर्व लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.
हेही वाचा:Panjim | ३८८ वर्षे जुना पोर्तुगीजकालीन पूल खचला!

गेली अनेक वर्षे ही याेजना बंद

एखाद्या घरातील कर्ता पुरुष ​किंवा महिला गेल्यावर त्यांच्या कुटुंबावर काय आर्थिक स्थिती काेसळते हे आम्हाला माहीत आहे. गेली अनेक वर्षे ही याेजना बंद होती. पण, आम्ही ती पुन्हा सुरू केली आहे. लाभार्थ्यांनी या पैशाचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी ​किंवा व्यवसायासाठी करावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
हेही वाचा:Blog | GANPATI BAPPA LETTER | गणपती बाप्पाचे पत्र…

वाहतूक नियम कडक करणार

राज्यात सरासरी वर्षाला २५० जणांचा रस्ता अपघातात मृत्यू हाेत आहे. यासाठी लाेकांनी वाहतूक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. पण, लाेक वाहतूक नियमांचे पालन करताना दिसत नाही. बहुतेक वेळी रात्रीचे होणारे अपघात हे दारूच्या नशेत हाेत असल्याचे आढळून आले आहे. यासाठी आता सर्वत्र सूचना फलक लावण्यात येणार असून वाहतूक नियम कडक केले जाणार अाहेत, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
हेही वाचा:डेकोरेशन करताना शॉक बसून 17 वर्षीय युवकाचा मृत्यू…

सर्व अर्जदारांना लाभ मिळणार : गुदिन्हो

गेली अनेक वर्षे या तक्रारी पडून होत्या. अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य मिळत नव्हते पण, आता सरकारने यामध्ये पुढाकार घेतला आहे. या सर्व अर्जदारांना याचा लाभ मिळणार आहे. एखाद्या व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यावर त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळते. सरकारचा पाठिंबा म्हणून त्यांना दाेन लाख रुपये देण्यात येत आहे, असे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.        
हेही वाचा:गणेशोत्सवावर पावसाचे सावट…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!