ALLEGATIONS | POLITICS | गिरीश चोडणकर भ्रष्टाचारी, गुन्हेगारी वृत्तीचे, धर्मांध!

ट्राजन डिमेलोंचा घाणाघात : गिरीश, आलेक्ससह दिनेश रावही पैशाच्या व्यवहारात!

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : पक्षातून मला काढण्यात आलंय हे मला मिडीयातून कळालय. मला अजूनपर्यंत काहीच कागदोपत्री कळविण्यात आलं नसल्याचं ट्राजन डिमेलो म्हणालेत. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांसहीत आलेक्स रेजिनाल्ड आणि गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश रावही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारात अडकल्याचा घणाघाती आरोप यावेळी ट्राजन यांनी केला.

दिनेश रावही पैशांच्या व्यवहारात!

गिरीश चोडणकर हे भ्रष्टाचारी, गुन्हेगारी वृत्तीचे आणि धर्मांध आहेत. गिरीषसह आलेक्स आणि गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश रावही पैशांच्या व्यवहारात गुतल्याचा घणाघाती आरोप ट्राजनो यांनी केला. कसिनोंच्या विषयावर गिरीश चोडणकर काँग्रेस प्रवक्त्यांना पत्रकार परीषद घेण्यापासून रोखतात. हे सेटींग नाही का? असा सवाल ट्राजनो यांनी केला.

सांकवाळमध्ये २५ लाख घेऊन सेटिंग!

जिल्हा पंचायत निवडणूकीवेळी सांकवाळमध्ये भाजपची उमेदवार बिनविरोध निवडून आली. तिथं काँग्रेस उमेदवार न घालण्यासाठी २५ लाख घेऊन सेटींग करण्यात आलं असा आरोपही ट्राजनोंनी यावेळी केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!