‘म्हादईबाबतचे आरोप खरे निघाले तर मी राजीनामा देईन!’, मुख्यमंत्र्यांना कुणी दिलं प्रत्युत्तर?

म्हादईवरुन गोवा वि. कर्नाटक!

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : म्हादईवरुन गोवा विरुद्ध कर्नाटक संघर्ष आधीच पेटलाय. यात भर पडली आहे ती कर्नाटकच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची. कर्नाटकचे जलस्त्रोत मंत्री रमेश जर्कीहोली यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय. गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी म्हादईवरुन केलेले आरोप निराधार असल्याचं जर्कीहोली यांनी म्हटलंय. म्हादईचं पाणी बेकायदेशीररीत्या कर्नाटकने पळवल्याचा करण्यात आलेला आरोपाचही त्यांनी खंडण केलंय.

जर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केलेले आरोप खरे ठरले, तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन, असं कर्नाटकच्या जलस्त्रोत मंत्र्यांनी म्हटलंय. इतकंच काय तर राजकीय हेतूने सावंत यांनी म्हादईवरुन कर्नाटवर आकरोप केले असल्याचाही टोला त्यांनी लगावला आहे.

कळसा नाल्यातून मलप्रभेत पाणी जाऊ नये, यासाठी उभारण्यात आलेली भिंतही तशीच ठेवल्याचा दावा कर्नाटकच्या मंत्र्यांनी केलाय. राष्ट्रीय हरीत लवादने वाटून दिल्याप्रमाणेच म्हादईचं पाणी वापरलं जात असल्याचं जर्कीहोली यांनी म्हटलं आहे. आता कर्नाटकचे जलस्त्रोत मंत्री जर्कीहोली यांनी केलेल्या वक्तव्याला गोव्याचे मुख्यमंत्री काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचंय.

कोर्टाबाहेर सेटलमेन्ट नाही!

याआधीची जर्कीहोली यांनी अशाच प्रकारे वक्तव्य केलं होतं. कर्नाटकच्या मंत्र्यांनी गोव्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला होती. दरम्यान आता मुख्यमंत्री सावंत यांनी कोर्टाबाहेर कोणतीही सेटलमेन्ट करणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यानंतर जर्कीहोली यांनी केलेल्या वक्तव्याला महत्त्व आलंय. आता यावरुन राज्यातील सत्ताधारी नेते नेमकं काय म्हणतात, हे पाहण महत्त्वाचंय.

म्हादईचं पाणी कर्नाटकनं मलप्रभेत वळवण्यात कर्नाटकला यश आल्याचं समोर आलं होतं. ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी प्रोग्रेसिव्ह फ्रन्ट ऑफ गोवाच्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी पाहणी केली होती. याबाबत गोवनवार्ता लाईव्हशी बोलताना त्यांनी धक्कादायक वास्तव सांगितलं होतं. काय म्हणाले होते केरकर..

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!