मातृभाषेमुळंच मुलांचा सर्वांगीण विकास : सिद्धेश नाईक

मोप सरकारी उच्च प्राथमिक विद्यालयात शिक्षक-पालक समितीची पुनर्रचना

साहिल नारुलकर | प्रतिनिधी

पेडणे : प्राथमिक स्तरांवर मातृभाषेतुन शिक्षण घेतल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. विषयांचे पूर्ण आकलन होते, तसेच पालक-शिक्षक यांच्या समन्वयामुळे मुलांचा सर्वांगीण विकासाबरोबर त्यांच्या भावनांचा, विचारांचा विकास योग्य रीतीने होतो. तसेच ही मुलं जीवनात अग्रेसर असतात, असे प्रतिपादन सरकारी उच्च प्राथमिक विद्यालय मोपचे नवनिर्वाचित पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष सिद्धेश साबा नाईक यांनी केले.

शाळेने पालक शिक्षक संघ व शालेय व्यवस्थापन समिती पुनर्रचना करणे आणि अन्य विषयांवर चर्चा करण्यासाठी शाळेच्या सभागृहात पालकांची बैठक बोलावली होती. यावेळी नवनिर्वाचित शा. व्या. समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर श्रीराम परब यांनी विचार मांडले.

यावेळी व्यासपीठावर माजी अध्यक्षा दिशा परब, माजी उपाध्यक्ष संजय परब, माजी अध्यक्ष अरुण नाईक व उपाध्यक्ष शरद नारायण मोपकर, मुख्याध्यापक महेश काशालकर, चंद्रकला मोपकर, व सिया सज्जन राऊळ उपस्थित होते.

शालेय व्यवस्थापन समिती अशी : अध्यक्ष – चंद्रशेखर श्रीराम परब, उपाध्यक्ष- चंद्रकला मोपकर, सचिव- मुख्याध्यापक महेश काशालकर, अन्य सदस्य मोप गावच्या सरपंच सरस्वती दत्ताराम नाईक, लक्ष्मण अनिल परब, महेश अंकुश परब, रत्नाकर विजय नाईक, नंदकुमार वामन नाईक, अभि अनंत सावंत, अंकिता अशोक मोपकर, समीक्षा समीर घुरे, दिव्या दिगंबर राऊळ.
पालक शिक्षक संघटना अशी : अध्यक्ष सिद्धेश साबा नाईक, उपाध्यक्ष संजय तुकाराम परब, सचिव सिया सज्जन राऊळ, अन्य सदस्य शिक्षिका प्रिया अमोल असोलकर, शिक्षिका समिता राघोबा तांबोस्कर, अनिल लक्ष्मण परब, संगीता रवींद्र धारगळकर, सुगंधा समीर परब, आरती गुरुदास सावंत, पूजा प्रभाकर सावंत, गुणवंती नाईक.

बैठकीत पालकांना आरोग्य विषयक माहिती शिक्षिका शीतल महाले यांनी दिली. शैक्षणिक माहिती प्रिया असोलकर यांनी दिली. बैठकीत महेश कशालकर व श्रद्धा ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन शिक्षिका वंदना शेट्ये हिने केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!