गावच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं

आमदार प्रवीण झांट्ये यांचं डिचोलीवासियांना आवाहन

विनायक सामंत | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गावच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन आमदार प्रवीण झांट्ये यांनी केलंय. जिल्हा पंचायत निधीतून मये मतदारसंघातील चोडण आणि पिळगाव येथे दोन ठिकाणी उभारण्यात आलेल्या गणेश विसर्जन स्थळांचं काम पूर्ण झालं आहे. बुधवारी दोन्ही ठिकाणी आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमात आमदार प्रवीण झांट्ये यांच्या हस्ते या प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचाः मुलभूत हक्क मिळवण्यासाठी आरजीच्या लढ्यात सहभागी व्हा

मयेतील गणेश विसर्जन स्थळाचं उद्घाटन करताना आमदार झांट्ये यांनी हिंदुस्तान कोका-कोला आणि इंडियन रेड क्रॉसतर्फे चिखली उपजिल्हा रुग्णालयाला उपकरणे प्रदान केली.

कारभाट-चोडण येथे गणेश विसर्जन शेडच्या उद्घाटन सोहळ्यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष कार्तिक कुडणेकर, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, सरपंच कमलाकांत वाडयेकर, उपसरपंच बबिता कळंगुटकर, पंच दिक्षा कुंडईकर आणि अन्य उपस्थित होते. बागवाडा-पिळगाव येथील कार्यक्रमावेळी आमदारांसमवेत जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, पिळगावची उपसरपंच उर्मिला परब गावकर, स्थानिक पंच संदीप सालेलकर, अभियंते राजेश दळवी आदी उपस्थित होते.

चतुर्थीपूर्वी गणपती विसर्जन स्थळाचं काम करण्यात आल्यानं स्थानिक गणेशभक्त नागरिकांनी समाधान व्यक्त केलं.

हा व्हिडिओ पहाः NIPAH Virus | कोरोनानंतर आता आणखी एका व्हायरसचा धोका!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!