ALERT | समुद्रात उतरु नका

दृष्टिकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः किनारपट्टीवर जीवरक्षक सेवा पुरविणाऱ्या दृष्टी जीवरक्षक कंपनीने समुद्रकिनारी येणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. खडकाळ भाग तसंच उंचवठ्यावर न जाण्याचा सल्लादेखील देण्यात आला आहे. पावसाळ्यात खडक सुळसुळीत झालेले असतात. त्यामुळे घसरून पडण्याची शक्यता असते. एक छोटा मुलगा सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असताना काब द राम किल्ल्यावरून खाली पडला. तसंच गेल्या आठवड्यात दोन तरुण उतोर्डा समुद्रकिनाऱ्यावर समुद्रात उतरण्यास मनाई असताना तसंच जीवरक्षकांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून पाण्यात उतरल्याने बुडाले.

हेही वाचाः देशात समान नागरी कायद्यासाठी केंद्रानं पावलं उचलावीत

मागच्या आठवड्यात तिघांचा मृत्यू

किनाऱ्यावरील पर्यटकांमध्ये वाढ झाली आहे. राज्यात असे अनेक किनारे आहेत ज्या ठिकाणी जीवरक्षक नाहीत. तसंच लोकांचा जास्त वावर नाही. त्यामुळे लोकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला घडलेल्या एका दुर्दैवी घटनेत एका छोट्या मुलाने  धोकादायक काठावरुन सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात असताना काबो द राम किल्ल्यावरील खडकाळ टेकडीवरून घसरून तो पाण्यात पडला. उतोर्डा येथे दोन तरुण खवळलेल्या समुद्रात आपला जीव गमावला. अशा घटनांना सामोरे जाणं खूप वेदनादायक आहे. त्यामुळे किनारी भागात येणाऱ्या पर्यटकांनी समुद्रात प्रवेश करू नये, असं कंपनीचे ऑपरेशन्स हेड नवीन अवस्थी यांनी सांगितलं.

हेही वाचाः गोवा स्वंयपूर्णतेच्या दिशेने -मुख्यमंत्री

कृपया समुद्रात उतरू नये

पावसाळ्यात समुद्र अत्यंत खवळलेला असतो. त्यामुळे समुद्रात उतरलेल्या व्यक्तीला लाटांचा अंदाज येत नाही. यापूर्वी असुरक्षित क्षेत्र ओळखून हे नो-सेल्फी झोन म्हणून अधोरेखित केले आहेत. मात्र या नियमांचं सर्रास उल्लंघन केलं जात आहे. लोक आपल्या जीवाशी खेळ करत असतात. किनारपट्टीवरील निसरड्या आणि खडकाळ भागात होणारे अपघात आणि पडण्याचं प्रमाण कमी करण्याच्या प्रयत्नात हा सतर्कतेचा इशारा दिला आहे.
सर्व किनाऱ्यांवर लाल झेंडे लावले आहेत, जे नॉन-स्विम झोन म्हणून अधोरेखित केले आहेत, असं अवस्थींनी सांगितसं. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!