अल्कोहोलमुक्त सेनिटायझर बनवण्याचा प्रयोग यशस्वी, सावर्डेमधील शाळेनं केली कमाल

सावर्डे सत्तरी सरकारी शाळेचा प्रयोग

Goan Varta Live | प्रतिनिधी

नगरगाव : एक भारी बातमी आहे. अल्कोहोलमुक्त सेनिटायझर एका शाळेनं बनवलेत. त्यांचा प्रयोगही यशस्वी झाला. राज्यात असलेल्या सावर्डे सत्तरी सरकारी माध्यमिक विद्यालयानं हा प्रयोग केला होता. त्याला अखेर मोठं यश आलंय.

काय होता प्रयोग?

सावर्डे सत्तरी सरकारी माध्यमिक विद्यालयात अल्कोहोलमुक्त असं आरोग्यदायी सेनिटायझर बनविण्यात आलंय. हे सेनिटायझर तयार केल्यानंतर ते यशस्वी झाले की नाही तपासण्यासाठी त्यात दह्याचं मिश्रण करण्यात आलं. एका दिवसांनंतर त्याची तपासणी केल्यावर त्यातील बॅक्टेरिया मरण पावल्याचं निदर्शनास आलंय. त्यामुळे अल्कोहोलमुक्त सेनिटायझरचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

कौतुक तर होणारच!

प्रयोग यशस्वी झाल्यानं सावर्डे शाळेचं सर्वत्र कौतुक होतंय. याकामात सावर्डे शाळेचे माजी मुख्याध्यापक आणि आता नगरगाव शाळेचे मुख्याध्यापक म्हणून नियुक्त झालेले देविदास कोटकर यांनी मोलाचं सहकार्य केलंय. सहाय्यक प्रयोग शाळा शिक्षिका चांदनी गावकर, तन्वी धुरी आणि अन्य शिक्षकांच्या मदतीने हा प्रयोग सुरु केला होता. त्यात यश आल्याने भविष्यात शाळा सुरु झाल्यानंतर मुलांना असे नैसर्गिक सेनिटायझर वापरणे सुरक्षित असे बनणार आहे.

अल्कोहोलमुक्त सॅनिटायझरची पर्याय

मार्च महिन्यापासून कोविड 19चा प्रभाव आहे. या कोविडच्या नियंत्रणासाठी सेनिटायझरचा वापर सर्वत्र केला जातो आहे. त्यामुळे गेल्या सात आठ महिन्यापासून सेनिटायझरला वाढती मागणी बनलेली आहे. कोविडच्या भितीमुळे लोक आता आपल्या निवासस्थानी देखील सेनिटायझर आणून ठेवतायत. पण हे बाजारातील विकतचे सेनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. जे आरोग्याला हानिकारक बनलंय.

सरकारी कार्यालयात, खाजगी आस्थापने, स्वयंसेवा भांडारे इत्यादी ठिकाणी जाताना सेनिटायझरचा वापर अनिवार्य केलेला आहे. विशेष करुन शाळेमध्ये शिक्षक वर्गांना शाळेत प्रवेश करताना विविध कामे करताना सेनिटायझरचा वापर करावा लागतो आहे. पण हे सेनिटायझर आरोग्याला सुरक्षित नाही. हा धोका ओळखून सत्तरी तालुक्यातील सावर्डे सरकारी माध्यमिक शाळेतील शिक्षकांनी चर्चा केली होती.

…असा साकारला प्रयोग

शाळेतील विज्ञान प्रयोग विभागात गेले काही दिवस प्रयोग सुरु केला होता. हे नैसर्गिक सेनिटायझर बनविण्यासाठी कडूनिंब, कापूर, एलोव्हेरा, हळद या चार घटकांचा वापर केला गेला. हे नैसर्गिक अल्कोहोल विरहीत सेनिटायझर आहे. हे चारही घटक एकत्र करण्यात आलेत. प्रयोग शाळेत प्रयोग नळीतील जंतू मरण्यासाठी भांड्यात शंभर डिग्री सेल्सेयल्स तापमानात उकळण्यात आले. नंतर ते रसायन फिल्टर करण्यात आले आणि नैसर्गिक सेनिटायर तयार झाले आहे.

मुख्याध्यापक देविदास कोटकर म्हणाले की…

बाजारातील विकत घेतलेले सेनिटायझरमध्ये अल्कोहोल असते. ते नेहमी वारंवार वापरणे हानिकारक आहे. म्हणून आम्ही वेगळा विचार करुन चार घटक वापरून सेनिटायझर तयार केले आहे. या सेनिटायझरचा कोणताही साईड इफेक्ट नाही. त्यात हळद आणि अन्य औषधी घटक असल्याने नेहमी वापरल्यास कोणताही शरिराला धोका नाही. बहुतेक हा राज्यातील शाळेतील हा पहिलाच प्रयोग म्हणावा लागेल.

मुंबईत जायचा विचार करत असाल तर ही आकडेवारी तुमच्यासाठीच!

#JusticeForKiranRajput ट्रेन्ड होण्यामागची सगळी गोष्ट

करोना योद्ध्यांनाही आता सरकार माघारी पाठवणार का?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!