आयटकतर्फे आझाद मैदानावर धरणे

नारायण गवस | प्रतिनिधी
पणजी: विविध खात्याच्या कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी तसंच किमान वेतन लागू करण्यासाठी आयटकच्या अध्यक्षतेखाली बुधवारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन केलं. यावेळी आयटकतर्फे कामगारांना किमान वेतन लागू करणं तसंच कामगारांच्या प्रलंबित मागण्या लवकर सोडविण्याची माणगी करण्यात आली. यावेळी आझाद मैदनावर आयटकचे कामगार नेते एड. ख्रिस्तोफर फोन्सेका, एड. राजू मंगेशकर तसंच इतर पदाधिकारी कामगार उपस्थित होते.

मागिल ३ वर्षात सुमारे २५ हजार लोकांना नोकऱ्या गमावल्या
राज्यात मागिल ३ वर्षात सुमारे २५ हजार लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. करोनामुळे अनेक जाणांचा नाकऱ्या गेल्या. त्याचप्रमाणे खाणी बंद असल्यानं कामगार बेरोजगार झाले आहेत. पण सरकारने या कामगारांना अजून न्याय दिलेला नाही. तसंच अजूनही सरकारी खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात कंत्राटी तत्वावर रोजंदारीवर काम करत आहे. त्या कामगारांना किमान वेतन अजून लागू करण्या आलेलं नाही. किमान वेतन ८०० रुपये लागू करणं गरजेचं आहे, असं यावेळी आयटकचे कामगार नेते एड. ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितलं.
कदंबा महामंडळमध्ये अजूनही बदली कामगार
कदंबा महामंडळमध्ये अजूनही बदली कामगार काम करत आहे त्यांना सेवेत घेतलेले नाही. तसंच नदी परिवाहन खात्यात असेच कामगार आहेत. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सोसायटी अंतर्गत कामगार काम करत आहे. तसंच काही कामगार हे कंत्राटी तत्वावर काम करत आहेत. त्यांना अजून किमान वेतन लागू केलेलं नाही. तसंच औद्योगिक क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना अजून किमान वेतन दिलेलं जात नाही.

कामगार कायद्यांचं उल्लंघन
कामगार कायद्यांचं उल्लंघन केलं जात आहे. काही कंपन्या कामगारांचे मुलभूत हक्क त्यांना देत नाहीत. अजूनही कामगार तुटपुंजा पगारावर काम करत आहेत. याची सरकारने दखल घेणं गरजेचं आहे. कामगारांना सरकाने न्याय द्यावा, त्यांच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य कराव्या, असं यावेळी कामगार नेते एड. ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी सांगितलं.