दिल्ली-गोवा विमानात एकच गोंधळ! दहशतवादी असल्याचं सांगत प्रवाशांना घाबरवलं!

Goan Varta Live | प्रतिनिधी
वास्को : एअर इंडियाच्या दिल्ली–गोवा विमानात विचित्र घटना घडलीये. या विमानातून प्रवास करणारया एका तीस वर्षीय प्रवाशाने विमानात दहशतवादी असल्याचा सांगत लोकांना घाबरवलंय. यामुळे विमानात एकच गोंधळ उडाला होता. या प्रवाशानं विमानात दहशवादी असून ते विमानाचं अपहरण करणात असल्याचा इतर प्रवाशांना सांगितलं. त्यामुळे काही वेळासाठी विमानातील प्रवाशांचीही घाबरगुंडी उडाली होती. हे विमान दिल्लीहून गोव्याला येत होते. ज्या माणसानं हा प्रकार केला तो मूळचा दिल्लीचा असल्याचं समोर आलंय.
गुरुवारी हे विमान सायंकाळी दाबोळी विमानतळावर उतरलं. त्याला एअर इंडियाच्या कर्मचारी वर्ग आणि केंद्रिय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी ताब्यात घेऊन दाबोळी विमानतळ पोलिसांच्या ताब्यात सोपवलं. गुरुवारी दुपारी नवी दिल्लीहून सुटलेल्या एअर इंडियाच्या दिल्ली-गोवा विमानातून कुटुंबासह प्रवास करणाऱ्या त्या युवकाने स्वतः स्पेशल सेलचा अधिकारी असल्याचे सांगितलं. त्यानंतर विमानमध्ये आतंकवादी असल्याची माहिती इतर प्रवाशांना देण्यास सुरुवात केली.
हवेतच घाबरगुंडी
यामुळे इतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. याप्रकरणी दाबोळी विमानतळावरील सुरक्षा एजन्सीला माहिती
देण्यात आली. सायंकाळी साडे चारला हे विमान दाबोळी विमानतळावर लॅन्ड झालं. त्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचारी वर्गाने आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने त्वरित या माणसाला ताब्यात घेतलं.
विमानात वेडेपणा
या माणसाचं मानसिक संतुलत ठीक नसल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. त्याच्यावर दिल्लीतील मानसोपचार इस्पितळामध्ये त्याच्यावर उपचार करण्यात येत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, त्याला ताब्यात घेतल्यावर वैद्यकीय तपासणीसाठी चिखली उपजिल्हा इस्पितळामध्ये नेण्यात आले. तेथील वैदयकीय तपासणीनंतर दंडाधिकारयाकडून आवश्यक आदेश मिळाल्यावर त्याला मानसशास्त्र आणि मानव व्यवहार संस्थेमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या सगळ्या प्रकाराचा विमानातील प्रवाशांना नाहक मनस्ताप झालाय.