काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव आज गोव्यात

तीन दिवसीय दौऱ्यात गट काँग्रेस समितीसोबत चर्चा करणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गोवा काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव आज गोव्यात येणार आहेत. आपल्या तीन दिवसीय दौऱ्यात ते गट काँग्रेस समितीसोबत चर्चा करणार आहेत, अशी माहिती जीपीसीसीचे उपाध्यक्ष एम. के. शेख यांनी दिली.

हेही वाचाः कांदोळीत ‘सीआरझेड’मधील बांधकामं पाडली

तीन दिवसीय गोवा दौरा

एआयसीसी प्रभारी गुरुवारी 5 ऑगस्ट 2021 रोजी 11 वाजता सांगे येथे भेट देतील आणि पोलिस स्टेशनच्या जवळील गुरुकुल हॉलमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. याच दिवशी ते सांगे, कुडचडे आणि केपे गट काँग्रेस समितीची भेट घेतील. तर शुक्रवारी ६ रोजी काणकोण, वेळळी, चिंचोणे आणि कुंकळळी मधील गट काँग्रेस सदस्यांसोबत चर्चा करतील, अशी माहिती शेख यांनी दिली.

हेही वाचाः नाव बदलावंच लागलं! भूमीपुत्र नाव वगळणार, आता भूमी अधिकारिणी विधेयक

युतीबाबत काय सांगतील याकडे लक्ष

दरम्यान, मागच्या भेटीत त्यांनी गोव्यातील पक्षस्थितीचा आढावा घेऊन दिल्लीत पक्षश्रेष्ठींनी अहवाल सादर केला होता. या भेटीत गोवा प्रदेशाध्यक्ष पदाबाबत आणि समविचारी पक्षांच्या युतीबाबत ते काय सांगणार, याकडे कार्यकत्यांचं लक्ष लागलं आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Viral | कॅब ड्रायव्हरला का केली तरुणीनं मारहाण?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!