अहाना सांगुईला विद्यार्थी विज्ञान मंथन स्पर्धेत दुसरा क्रमांक प्राप्त

नेव्ही चिल्ड्रेन स्कूलची नववीत शिकणारी विद्यार्थीनी; राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठीत स्पर्धेत मिळवलं यश

दयानंद राणे | प्रतिनिधी

वास्कोः गोव्याच्या नेव्ही चिल्ड्रेन स्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकणाऱ्या अहाना सांगुई हिने राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठीत विद्यार्थी विज्ञान मंथन स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा एनसीआरटीने विज्ञान भारती आणि विज्ञान प्रसार यांच्या सहकार्याने आयोजित केली होती.  

हेही वाचाः फोन कॉल नाही, ओटीपी, पिनची मागणी नाही ; महिलेच्या अकाऊंटवरुन 3 लाख गायब

वेगवेगळ्या टप्प्यात विद्यार्थ्यांचं मूल्यमापन

शालेय मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करणं, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात भारताच्या योगदानाबद्दल त्यांना शिक्षित करणं हा उद्देश्य विद्यार्थी विज्ञान मंथन आयोजित करण्यामागील आहे. शाळा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर सहभागींचे वर्ग-सह-वर्ग असे वेगवेगळ्या टप्प्यात मूल्यमापन केलं गेलं; बहु-स्तरीय चाचणी प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना जावं लागलं.

हेही वाचाः ‘आप’ची सत्ता आल्यास पंजाबमध्ये 300 युनिट वीज मोफत !

प्रत्येक राज्यातून दोन विजेत्यांनी घेतला राष्ट्रीय स्तरावर भाग

प्रत्येक राज्यातून दोन विजेत्यांनी राष्ट्रीय स्तरावर भाग घेतला होता. विद्यार्थी विज्ञान मंथनाच्या विजेत्यांसाठी नॅशनल सायन्स लॅबोरेटरीज आणि प्रख्यात शास्त्रज्ञांशी सुसंवाद आणि केंद्रांना भेटी असा कार्यक्रम आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!