आग्वाद सांगणार गोवा मुक्तीची गाथा

गोव्या मुक्तीसंग्रामाचा इतिहास रोचक आहे.

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः १९ डिसेंबर, गोवा मुक्तीसंग्राम दिन. या दिवशी गोवा हे भारतीयांपासून परदेशी पर्यटकांपर्यंत पर्यटनाचं प्रमुख केंद्र बनलं. पण भारतातील या चिमुकल्या राज्याच्या स्वातंत्र्याचा इतिहास रोचक आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या 150 वर्षांच्या जुलमी राजवटीतून भारतीयांची सुटका झाली. भारताच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरपासून ते हैदराबाद पर्यंतची अनेक संस्थानंसुद्धा भारतात सामील झाली; पण गोवा, दीव, दमण हे भारताच्या स्वातंत्र्यानंतरदेखील पोर्तुगीजांच्या अमलाखालीच होते. गोवा आणि महाराष्ट्रातील आंदोलकांच्या अथक चळवळींमुळे 19 डिसेंबर 1961 रोजी गोवामुक्तीचे स्वप्न सत्यात उतरलं. गोव्याच्या पोर्तुगीजांपासूनच्या मुक्तीसाठी शेकडो लढाऊ स्त्री-पुरुष सत्याग्रहींना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. हा संग्राम आणि गोव्याला पोर्तुगीजांच्या राजवटीतून मुक्ती मिळवून देण्यासाठी झगडताना स्वातंत्रसैनिकांचे झालेले हाल, याचा एक महत्वाचा साक्षिदार म्हणजे किल्ला आग्वाद. हा किल्ला हे पर्यटकांचे आकर्षण. या किल्ल्यात बंद कोठड्या होत्या. या कोठड्यांमध्ये बरेच स्वातंत्रसैनिक बराच काळ राहिलेत. यंदा गोवा मुक्तीला ६० वर्षं पूर्ण झालीत. याच निमित्त्याने या पर्यटन स्थळाचे लोकार्पण होणार आहे.

आग्वाद किल्ल्याचे सुशोभिकरण करताना इतिहासातील संचिते जपण्याच्या हेतूने आग्वाद येथील पूर्वीच्या कारागृहाचे आता गोवा मुक्तीपर्व स्मृतिस्थळ म्हणून रुपांतर करण्यात आलेय. मार्चमध्ये या प्रकल्पांचे लोकार्पण केले जाणारेय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष दयानंद सोपटे यांनी आग्वादच्या किल्ल्यात सुरू असलेल्या कामाची पहाणी केलीये.

गोवा मुक्तीच्या स्मृती जपणारे स्थळ म्हणून विकसित…

आग्वाद येथील पूर्वीच्या कारगृहाचे गोवा मुक्तीच्या स्मृती जपणारे स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पायाभूत सुविधा, दुरुस्ती, नूतनीकरण यांचे ९० टक्के काम पूर्ण झालेय. फेब्रुवारीच्या पहिल्या वा दुसर्‍या आठवड्यात त्या कामाची पाहणी केली जाणारेय. त्या ठिकाणी गोवा मुक्तीच्या स्मृती कशा प्रकारे जपल्या जाव्यात, या संदर्भात स्वातंत्र्यसैनिकांच्या संघटनांचे प्रतिनिधी, इतिहास अभ्यासक, पुरातत्व संशोधक यांची बैठक घेतली. त्यांनी काही महत्वपूर्ण सूचना केल्या. त्या सर्व सूचनांचे पालन सरकार करणारेय.

स्वातंत्र्यसैनिकांचे पुर्णाकृती पुतळे आग्वादमध्ये…

पर्यटनाच्या उद्देशाने आग्वाद किल्ल्याचे सुशोभिकरण करण्यात येणारेय. या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून राम मनोहर लोहिया आणि टी.बी. कुन्हा यांचे पुर्णाकृती पुतळे आग्वादमध्ये असतील. ते कोठडीत आहेत असे दर्शवणारा देखावा तयार केला जातील. त्यासाठी त्या काळातील साहित्याचाच वापर केला जाईल. आग्वाद किल्ल्यावर तोफा पूर्ववत बसवण्यात आल्यात. आग्वादमध्ये एक फाशी देण्याची जागा आहे. त्या स्थळाचेही संवर्धन होणारेय.

स्वातंत्रसैनिकांना विशेष निमंत्रण

गोवा मुक्तीच्या पाऊलखुणा जपत नव्या पिढीपर्यंत ती प्रेरणादायी माहिती पोचवणार्‍या आग्वादच्या नव्या रुपातील किल्ल्याचे लोकार्पण मार्चमध्ये होईल. यावेळी आग्वाद कारागृहात पोर्तुगीजांची कैद अनुभवलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना त्या ठिकाणी बोलावण्यात येणारेय. यापुढे तिथे कारागृह नसेल. ते सर्वांनाच गोवा मुक्तीची माहिती देणारे, पोर्तुगीजांची जुलुमशाहीची कहाणी सांगणारे ऊर्जा केंद्र असेल. पर्यटकांसाठी ते आकर्षण केंद्र असेल.

प्रकल्पासाठी केंद्राकडून मदतीचा हात

या प्रकल्पासाठी केंद्राकडून 25 कोटींचा निधी मिळणारेय. या निधीत हे सगळं काम केलं जाईल. आग्वाद किल्ल्याच्या सुशोभिकरणाचं काम सुरू आहे. 90 टक्के काम पूर्ण झालंय. फेब्रुवारीत सरकारतर्फे या कामाची पहाणी होईल. मार्चात प्रकल्पाचे उद्घाटन होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!