शेती हा शेतकऱ्यांचा श्वास

मगोप नेते जीत आरोलकरांचं प्रतिपादन

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पारंपरिक पद्धतीला आधुनिक पद्धतीची जोड देऊन शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात विविध प्रकारची शेती केली आहे. अशीच शेती करून राज्यात आणि देशात क्रांती करुया. शेतीसाठी सर्वतोपरी मदत करण्याची माझी तयारी आहे. शेतकरी जगला पाहिजे तरच आपण जगू शकतो. अन्नदाता या देशात महत्त्वाचा आहे. त्याचं हित पाहणं आमचं कर्तव्य आहे, असं प्रतिपादन मांद्रेतील मगोप नेते जीत आरोलकर यांनी मोरजी गावडेवाडा येथील शेतकऱ्यांना मोफत नांगरणी ट्रॅक्टर उपलब्ध करून केलं.

ग्रामस्थांची उपस्थिती

यावेळी गौरेश कोरगावकर, गोपी गुणाजी हरमलकर, दिगंबर मालवणकर, प्रीतेश हरमलकर, विपुल दिगंबर मालवणकर, मोहन नागवेकर, उमेश मालवणकर, सचिन शेटगावकर आणि नरेंद्र शेटगावकर उपस्थित होते.

हेही वाचाः हवामानातील समतोलपणा राखण्यासाठी झाडं लावणं गरजेचं: श्याम साखळकर

शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी कार्यरत

मगोप नेते जीत आरोलकरांनी मतदार संघातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भात- बियाणी आणि आता नांगरणीसाठी मदत केली आहे. तो अमुक पक्षाचा तो तमुक पक्षाचा कार्यकर्ता असा मी भेदभाव करत नाही. ज्याला मदतीची गरज आहे त्याला मदत करणं माझं कर्तव्य समजतो मी. कोरोना काळात मांद्रे उदर्गत संस्थेने सुरुवातीच्या काळापासूनच मांद्रेवासियांना मदतीचा हात दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता शेतकऱ्यांच्या उत्कर्षासाठी मी कार्यरत आहे, असं आरोलकर म्हणाले.

शेतकऱ्यांना दिले ट्रॅक्टर

गावडेवाडा मोरजी येथील काही शेतकऱ्यांनी आरोलकरांकडे शेतीच्या नांगरणीसाठी ट्रॅक्टर मागितले होते. ते ट्रॅक्टर आरोलकरांनी त्यांना उपलब्ध करून दिले. आरोलकरांनी त्यांना लगेच ट्रॅक्टर दिल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!