मेळावलीवासीयांची पुन्हा एकदा राज्यातील सर्व नागरीकांना आर्त साद

सोमवारपासूनच आयआयटीविरोधातील विषय गाजतोय

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : सोमवारी रात्री शेळ-मेळावतीली ग्रामस्थांनी मदतीचं आवाहन केलं होतं. त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी मोठ्या घडामोडी घडल्या. आयआयटीविरोधील आंदोलन प्रचंड पेटलं. या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं. त्यानंतर आता आंदोलकांवर गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. तसंच पोलिसांनीही बुधवारी झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता, असा दावा केलाय.

हेही वाचा – आयआयटी आंदोलनातील या 21 जणांवर गंभीर गुन्हे दाखल

दुसरीकडे गोव्यातील नागरीकांना पुन्हा एकदा शेळ-मेळावलीवासीयांनी आर्त साद घातली आहे. सरकारकडून बळजबरीनं आमच्यावर हत्येचे गुन्हे नोंदवले जात असल्याचा आरोप शेळ-मेळावलीतील आंदोलकांनी केलेल्या मेसेजमध्ये करण्यात आला आहे. आपण सगळ्यांनी एकत्र जमून आयआयटीविरोधात तुम्ही आमच्या पाठीशी आहात, हे सिद्ध करण्यासाठी यावं, अशी विनंती या मेसेजमधून करण्यात आली आहे.

हेही वाचा – मेळावलीतील हल्ला पूर्वनियोतच! पोलिसांचा दावा

गेल्या काही दिवसांपासून पोलिस विरुद्ध आंदोलक असा संघर्ष पेटलाय. अगदी सुरुवातीलाही मेळावलीतील लोकांनी मदतीची आर्त साद गोमंतकीयांना घातली होती. त्यानंतर रिव्हॉल्यूशनरी गोवन्सच्या कार्यकर्त्यांनी वाळपईतील ठिय्या मोर्च्यामध्ये सहभाग घेतला होता. मेळावलीच्या शेजारील गावंही आंदोलकांच्या मदतीला धावून गेली होती. अस्तित्त्वाची लढाई लढणाऱ्या या गावकऱ्यांनी मागितलेल्या मदतीला आता गोमंतकीय जनता एकवटते का, हे पाहणं महत्त्वाचंय.

EXCLUSIVE VIDEO | विरोध, दगडफेक, लाठीचार्ज आणि मेळावलीवासियांचा आक्रोश

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!