कर्फ्यूमध्ये पुन्हा वाढ! मात्र व्यायाम शाळा आणि दुकानांना मोठा दिलासा

आता 12 तास खुली राहणार राज्यातील दुकानं

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. 7 दिवसांनी कर्फ्यू वाढवण्यात आला असून आता 19 जुलै पर्यंत कर्फ्यू वाढवत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, कर्फ्यूमध्ये जरी वाढ करण्यात आली असली, तरी दुकानांसोबत आता व्यायामशाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला दिलासा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे धार्मिक स्थळांबाबतही अल्पशा प्रमाणात ढिलाई देण्यात आली आहे.

काय आहे दिलासा?

राज्यात मागच्या दोन्ही वेळेला कर्फ्यूमध्ये वाढ करताना दुकानांच्या वेळा वाढवण्यात आल्या होत्या. यंदाही दुकानांच्या वेळेमध्ये वाढ केली जाण्याचं सत्र कायम आहे. आता राज्यातील दुकानं संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा असणार आहे. त्यामुळे दुकानदारांना मोठा दिलासा मिळालाय. राज्यातील रुग्णवाढ कमी होत असल्यानं राज्यातील दुकानदारांना दिलासा देण्यात आलाय. राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये वाढ करत असल्याची घोषणा करताना आता राज्यातील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत खुली ठेवण्यात परवानगी असणार आहे.

दुकानांसोबतच आता व्यायामशाळा आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सही खुली करण्यात येत आहेत. मात्र सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जावं यासाठी व्यायामशाळआ आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही 50 टक्के क्षमतेनं सुरु ठेवावीत, अशी मुभा देण्यात आली आहे. त्यासोबतच धार्मिळ स्थळं ही फक्त 15 माणसांच्या उपस्थितीतच खुली ठेवावीस, असेही निर्देश देण्यात आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ही २ हजाराच्या आत आल्यामुळे आता अधिक प्रमाणात कर्फ्यूमध्ये ढिलाई दिली जात असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र या सगळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : बेळगावहून गोव्याला येणाऱ्या कारचे तिलारी घाटात ब्रेक फेल

अखेर ढिलाईला सुरुवात

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने राज्य सरकारने ९ मेपासून राज्यव्यापी कर्फ्यूचा निर्णय घेतला होता. सुरुवातीचे काही दिवस केवळ अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता दिली. त्यानंतर दुकाने दुपारी ३ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता देऊन हॉटेल्स, रेस्टॉरन्टना पार्सल देण्यास मुभा देण्यात आली. पण, सलूनसह अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने सुमारे दोन महिने बंद राहिल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती.

हेही वाचा : राजेंद्र आर्लेकर 13 जुलै रोजी घेणार हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची शपथ

राज्यातील कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने सरकारने आम्हालाही निश्चित केलेल्या वेळेत सलून आणि दुकाने खुली ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी निवेदनेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर करण्यात आली होती. याची गंभीर दखल घेऊनच सरकारने कर्फ्यू कालावधीत वाढ केल्यानंतरही दुकानांसह सलून, मैदाने, क्रीडा कॉम्प्लेक्स सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!