आजची आकडेवारी आली! 762 नवे रुग्ण, चौघांचा मृत्यू, पण याहीपेक्षा चिंताजनक बाब म्हणजे…

राज्याचा रिकव्हरी रेट ८८.६५ टक्क्यांवर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : शनिवारी समोर आलेल्या कोरोना रुग्णवाढीच्या आकड्यांमध्ये नवे रुग्ण ७६२ नोंदवण्यात आले आहे, तर ४३६ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या काही दिवसांत बरे झालेल्या रुग्णांमधला हा सर्वाधिक दिलासादायक आकडा आहे. मात्र चिंताजनक बाब म्हणजे एवढे रुग्ण बरे होऊनही राज्याचा रिकव्हरी रेटमध्ये सुधार दिसून आलेला नाही.

corona update

राज्यातील आणखी चार जणांचा शनिवारी मृत्यू. पणजीतील ६८ वर्षीय महिलेसह मुरगावातील ५६ वर्षीय, नेरुलमधील ७५ वर्षीय आणि करंझाळेतील ४७ वर्षीय पुरुषाचं निधन. राज्यातील एकूण मृतांचा आकडा ८७२.

रिकव्हरी रेटची घसरगुंडी

राज्याचा रिकव्हरी रेट ८८.६५ टक्के इतका खाली घसरल्याचंच पाहायला मिळतंय. महिन्याभरापूर्वी १ हजारच्या आत असणारी सक्रिय रुग्णसंख्या आता तब्बल साडे सहा हजाराच्या पार गेली आहे. सध्याच्या घडीला राज्यात ६ हजार ६४३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढली, हे तर स्पष्ट आहे.

हेही वाचा – देशाच्या आरोग्य यंत्रणेचं काय झालंय? हे सांगणारे ६ Photo आणि तो एक Video!

मृत्यूदराची चिंता

राज्यातील मृतांचा आकडा लवकरच ९००च्या पार जाण्याची भीती आहे. कारण गेल्या तीन ते चार दिवसांत मृत्यूदर कमालीचा वाढला आहे. शनिवारी ४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता ८७२ वर पोहोचला आहे. तर ९७ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून ४३४ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. आतापर्यत राज्यात ६६ हजार २६१ रुग्णांचा कोरोनाचा संसर्ग झालेला असून त्यापैकी ५८ हजार ७४६ रुग्ण बरे झालेत.

हेही वाचा – ब्रेकिंग । आरोग्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

Corona Covid 19 India Tally

उत्तर-दक्षिण दोन्ही रुग्णवाढ

दरम्यान, उत्तर आणि दक्षिण गोव्यातील बेडची उपलब्धताही लवकरच चिंतेचा विषय बनण्याची शक्यता आहे. तसं झालं तर राज्याची आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची दाट भीती व्यक्त केली जाते आहे. सध्या उत्तर गोव्यात २७५ बेड्सची सोय दक्षिण गोव्यात १४४ बेड्सची सोय आहे. येत्या काळात बेड्सची उपलब्धतता वाढवण्यासाठी सरकार आणि प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न सुरु आहे. आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्देश प्रशासनाला दिलेत. दरम्यान, शनिवारीही वाढत्या रुग्णसंख्येची चिंता कायम आहे.

हेही वाचा – कोरोनाची ही आकडेवारी प्रत्येकानं पाहायलाच हवी! कोणत्या राज्यात किती मृत्यू आणि कुणाचं सरकार?

ठळक मुद्दे

उत्तरेत सर्वाधिक रुग्ण पर्वरीमध्ये – ५३१
पर्वरीपाठोपाठ पणजीतही ५००पेक्षा अधिक रुग्णसंख्या
पणजीमध्ये सध्या ५०८ रुग्णांची नोंद
कांदोळी, म्हापसामधील रुग्णवाढही ४००च्या पार
डिचोली, साखळी, पेडणेत रुग्णसंख्या शंभरीपार

दक्षिणेत सर्वाधिक रुग्णसंख्या मडगावमध्ये- ७५७
फोंडा, वास्कोमध्येही चिंताजनक स्थिती,
फोंड्यात ४६२ तर वास्कोत ३९८ रुग्ण
शहरांसोबतच ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग चिंताजनक

उत्तर गोव्यात किती रुग्ण?

डिचोली
14 एप्रिल – 110, 15 एप्रिल – 134, 16 एप्रिल – 143, 17 एप्रिल – 159

साखळी
14 एप्रिल – 115, 15 एप्रिल -124, 16 एप्रिल – 165, 17 एप्रिल – 154

पेडणे
14 एप्रिल – 114, 15 एप्रिल -134, 16 एप्रिल – 125, 17 एप्रिल – 132

वाळपई
14 एप्रिल – 52, 15 एप्रिल -60, 16 एप्रिल – 88, 17 एप्रिल – 85

म्हापसा
14 एप्रिल – 341, 15 एप्रिल -401, 16 एप्रिल – 426, 17 एप्रिल – 451

पणजी
14 एप्रिल – 322, 15 एप्रिल -398, 16 एप्रिल – 414, 17 एप्रिल – 508

हळदोणा
14 एप्रिल – 93, 15 एप्रिल – 116, 16 एप्रिल – 140, 17 एप्रिल – 118

बेतकी
14 एप्रिल – 46, 15 एप्रिल – 52, 16 एप्रिल – 54, 17 एप्रिल – 51

कांदोळी
14 एप्रिल – 344, 15 एप्रिल – 321, 16 एप्रिल – 416, 17 एप्रिल – 434

कासारवर्णे
14 एप्रिल – 11, 15 एप्रिल – 19, 16 एप्रिल – 30, 17 एप्रिल – 27

कोलवाळ
14 एप्रिल – 71, 15 एप्रिल – 86, 16 एप्रिल – 91, 17 एप्रिल – 98

खोर्ली
14 एप्रिल – 118, 15 एप्रिल – 137, 16 एप्रिल – 121, 17 एप्रिल – 126

चिंबल
14 एप्रिल – 180, 15 एप्रिल – 204, 16 एप्रिल – 228, 17 एप्रिल – 262

शिवोली
14 एप्रिल – 162, 15 एप्रिल – 164, 16 एप्रिल – 162, 17 एप्रिल – 148

पर्वरी
14 एप्रिल – 484, 15 एप्रिल – 558, 16 एप्रिल – 589, 17 एप्रिल – 531

मये
14 एप्रिल – 33, 15 एप्रिल -32, 16 एप्रिल – 35, 17 एप्रिल – 47

दक्षिण गोव्यात किती रुग्ण?

कुडचडे
14 एप्रिल -67, 15 एप्रिल -94, 16 एप्रिल – 91, 17 एप्रिल – 117

काणकोण
14 एप्रिल -85, 15 एप्रिल -98, 16 एप्रिल – 97, 17 एप्रिल – 101

मडगाव
14 एप्रिल -591, 15 एप्रिल -660, 16 एप्रिल – 725, 17 एप्रिल – 757

वास्को
14 एप्रिल -239, 15 एप्रिल -271, 16 एप्रिल – 370, 17 एप्रिल – 398

बाळ्ळी
14 एप्रिल -44, 15 एप्रिल -54, 16 एप्रिल – 57, 17 एप्रिल – 71

कासावली
14 एप्रिल -152, 15 एप्रिल -174, 16 एप्रिल – 180, 17 एप्रिल – 198

चिंचिणी
14 एप्रिल -99, 15 एप्रिल -110, 16 एप्रिल – 125, 17 एप्रिल – 118

कुठ्ठाळी
14 एप्रिल -265, 15 एप्रिल -284, 16 एप्रिल – 345, 17 एप्रिल – 382

कुडतरी
14 एप्रिल -87, 15 एप्रिल -89, 16 एप्रिल – 97, 17 एप्रिल – 96

लोटली
14 एप्रिल -71, 15 एप्रिल -89, 16 एप्रिल – 106, 17 एप्रिल – 121

मडकई
14 एप्रिल -42, 15 एप्रिल -46, 16 एप्रिल – 50, 17 एप्रिल – 53

केपे
14 एप्रिल -34, 15 एप्रिल -36, 16 एप्रिल – 50, 17 एप्रिल – 62

सांगे
14 एप्रिल -93, 15 एप्रिल -87, 16 एप्रिल – 89, 17 एप्रिल – 71

शिरोडा
14 एप्रिल -82, 15 एप्रिल -102, 16 एप्रिल – 102, 17 एप्रिल – 99

धारबांदोडा
14 एप्रिल -60, 15 एप्रिल -58, 16 एप्रिल – 73, 17 एप्रिल – 71

फोंडा
14 एप्रिल -387, 15 एप्रिल – 380, 16 एप्रिल – 417, 17 एप्रिल – 462

नावेली
14 एप्रिल -93, 15 एप्रिल – 89, 16 एप्रिल – 100, 17 एप्रिल – 112

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!