वेर्ला-काणकानंतर इतरही ग्रामपंचायतींचा कॉन्फिडन्स वाढला! कुठ्ठाळीतही निर्णय झाला

जवळपास सगळं बंद! फक्त या गोष्टी सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : वेर्ला-काणकानंतर आता कुठ्ठाळी ग्राम पंचायतीनंही धाडसी निर्णय घेतलाय. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेर्ला काणकानंतर कुठ्ठाळी ग्रामपंचायतीनं नोटीस जारी करत नवे निर्बंध जारी केले आहेत. हे नवे निर्बंध ९ मे पर्यंत लागू असणार आहेत. या निर्बंधांमुळे कुठ्ठाळी ग्रामपंचायतींमधील जवळपास सर्व दुकानं बंद राहणार आहे. हॉटेलची पार्सल सेवा फक्त सोडली, तर सर्वच गोष्टी बंद ठेवण्याचे आदेश नोटिशीतून देण्यात आले आहेत.

कुठ्ठाळीत काय-काय बंद?

सर्व रेस्टॉरंट आणि हॉटेल ग्राहकांसाठी बंद, फक्त पार्सल आणि टेक-अवे सेवा सुरु राहणार

बार, कॉफी शॉप, कॅन्टीन्स, खाद्य पदार्थांची सर्व दुकानं, मोबाईलची दुकानं, बंद राहणार आहेत.

३ मे रोजी काढण्यात आलेल्या नोटीशीमध्ये ९ मेपर्यंत नवे निर्बंध कुठ्ठाळी ग्रामपंचायतीनं लागू केले आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!