जीएमसीच्या बाहेर विक्रेत्यांनी पुन्हा थाटले व्यवसाय

पारंपरिक व्यावसायिक अजूनही पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी)च्या बाहेरील अवैध स्टॉल्स सरकारने पाडल्यानंतर आता काही दिवसांनी विक्रेते पुन्हा एकदा व्यवसाय करण्यासाठी जीएमसीच्या बाहेर हजर झालेत. या ठिकाणी नवीन लोकांनी जागा व्यापली आहे अशी भीती असताना दुसऱ्या बाजूने येथील पारंपरिक व्यावसायिक अजूनही पुनर्वसनाची वाट पाहतायत.

हेही वाचाः 2022 विधानसभा निवडणुकीत कमळच फुलणार!

यापूर्वी उपजिल्हाधिकारी आणि एसडीओ पणजी यांनी आपल्या आदेशात म्हटलं होतं की विक्रेत्यांनी सरकारी मालमत्तेत अतिक्रमण केलं आहे आणि सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी न घेता बांधकामं उभारली आहेत. आणि म्हणूनच जीएमसीबाहेरील त्यांचे स्टॉल्स, दुकाने ही अवैध ठरवत काही दिवसांपूर्वी ती पाडली होती.

हेही वाचाः गिरी येथे दुकानात चोरी; दोघांना अटक

पारंपरिक व्यावसायिकांचं लवकरात लवकर पुनर्वसन करा

पणजीचे माजी महापौर सुरेंद्र फुर्तादो यांनी असं म्हटलंय की ज्या विक्रेत्यांचे स्टॉल पाडले गेले आहेत त्यांचं लवकरात लवकर पुनर्वसन झालं पाहिजे. हा भाग पंचायतीच्या अखत्यारीत येत असल्यानं पंचायत मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी निधी जाहीर करावा आणि त्या भागाचं सौंदर्यीकरण करावं, असंही फुर्तादोंनी ठामपणे सांगितलं.

हेही वाचाः VIDEO VIRAL | ऐकावे ते नवलच! वधूच्या डोक्यावर तोडले जातात पापड

प्रश्न… प्रश्न… प्रश्न…

शनिवारी जीएमसीबाहेरचं हे चित्र समोर आल्यानंतर हा गोंधळ सुरूच राहील का? आणि पारंपरिक विक्रेत्यांवर अन्याय होईल? की सरकार पाऊल उचलत लवकरात लवकर त्यांचं पुनर्वसन करेल? असे विविध प्रश्न उपस्थित केले जातायत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!