२०२२ मध्ये सत्ता स्थापनेनंतर कॉंग्रेस गोव्यात मत्स्य चाचणी केंद्र उभारणार

गोवा कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांची घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोव्यात २०२२ च्या विधानसभा निवडणूकांत कॉंग्रेस पक्ष स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करणार आहे. आमचं सरकार नगर नियोजन कायद्याचं कलम १६-ब आणि सदर कलमाखाली रुपांतरीत केलेली सर्व जमीन रद्द करणार आहे. तसंच गोवा घटक राज्य दिन म्हणजे ३० मे २०२२ पूर्वी गोव्यात मत्स्य चाचणी प्रयोगशाळा स्थापन करणार आहे, अशी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. गोव्याचं पर्यावरण नष्ट करणारे तिन प्रकल्प रद्द करणार असल्याचं यापूर्वीच आमचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी १८ जून २०२२ रोजी ऐतिहासीक लोहीया मैदानावरुन जाहीर केलं आहे, असं त्यांनी पुढे सांगितलं.

हेही वाचाः ACCIDENT | बोरी बायपास रस्त्यावर एमआरएफचा मालवाहू कंटेनर कलंडला

कायद्याचं कलम १६-ब रद्द करणार

कॉंग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर नगर नियोजन कायद्याचं कलम १६-ब रद्द करुन सदर कलमाखाली रुपांतरीत केलेली सर्व जमिन परत मूळ दर्जावरच आणणार आहे. भाजप सरकारच्या ‘सुटकेस टू सुटकेस’ धोरणाखाली लोकांनी कलम १६-ब खाली आपली जमिन रुपांतरीत करु नये, असा इशारा यापूर्वीच आम्ही दिला होता, असं चोडणकर म्हणाले.

जनतेचा विश्वास आम्ही संपादन करणार

गोव्याची अस्मिता राखणं हे कॉंग्रेस पक्षाचं कर्तव्य असून लोक भावनांचा आदर करुन जनतेचा विश्वास आम्ही संपादन करणार आहोत. निसर्गाचं वरदान लाभलेल्या या भूमिचं रक्षण करणं आमची जबाबदारी आहे. मासे हा गोंयकारांचा आहार आहे. लोकांचं आरोग्य जपणारे मासे त्यांना उपलब्ध करुन देणं हे सरकारचं कर्तव्य आहे. गोवा घटक राज्य दिन ३० मे २०२२ पूर्वी आम्ही गोव्यात मत्स्य चाचणी केंद्राची उभारणी करणार आहोत. तसंच गोंयकारांना फार्माोलीन नसलेले मासे उपलब्ध करुन देणार आहोत, असं चोडणकर म्हणाले.

हेही वाचाः म्हापसा येथील श्री ज्वेलर्स दुकानात चोरी

आमचं सरकार एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करणार

लोकांची मागणी असतानाही, सरकारने कर्तव्यदक्ष अधिकारी आयव्हा फर्नांडिस यांची बदली केली. मडगावच्या होलसेल मासळी मार्केटात त्यांनी फार्माेलीन माफीयांवर कारवाई सुरू केल्यानेच सरकारने त्यांना छळलं. आमचं सरकार एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करुन लोकांना फार्माेलीन मुक्त मासळी उपलब्ध करुन देणार आहे, असं चोडणकर यांनी सांगितलं.

हा व्हिडिओ पहाः Video | NH-66 HIGHWAY WORK | पत्रादेवी ते बांबोळी हायवे धोकादायक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!