महागाईचा भडका! अमूलनंतर आता मदर डेरीनंही वाढवले दुधाचे दर

इंधन दरवाढीसोबत दूध दरवाढीने लोकं बेहाल

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : एकीकडे देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. अशातच इंधन दरवाधीचा परिणाम आता इतरही गोष्टींवर होताना पाहायला मिळू लागला आहे. काही दिवसांपूर्वीच अमूलने दुधासोबतच आपल्या काही प्रॉडक्टची किंमत दोन रुपयांनी वाढवली होती. त्यानंतर आता मदर डेरीचं दूधही महागलं आहे.

मदर डेरीने दुधासोबत आपल्या काही प्रॉडक्ट्सच्या किंमती दोन रुपयांनी वाढवल्या आहेत. एएनआयने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. मदर डेअरीने दुधाच्या वेगवेगळ्या वेरीएंटमध्ये दोन रुपयांची वाढ केली आहे. नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहे.

यापुढे मदर डेरीचं दूध खरेदी करताना ग्राहकांना दोन रुपये जास्त मोजावे लागणार आहे. इंधन दरवाढ आणि पॉवर सोर्सच्या महागलेल्या दरांमुळे दूध दरांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती मिळतेय. दिल्ली, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात मदर डेअरीच्या नव्या दरांची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात आली आहे.

हेही वाचा : 17 राज्यांमध्ये पेट्रोल शंभरीच्या पार! गोव्यातही लवकरच पेट्रोल सेन्च्युरी मारणार?

महागाईचा भडका!

कोरोना महामारीत आधीच सगळ्या गोष्टी महागल्यात. अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात. एकीकडे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य माणसापुढे अनेक समस्या उभ्या ठाकलेल्या असतानाच आता दैनंदिन जगण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टीही महाग होत चालल्या आहेत. त्याचा फटका लोकांना बसू लागल्यानं अनेकांचं बजेट कोलमडलंय.

हेही वाचा : फोडणी महागली! इंधनदरवाढीपाठोपाठ खाद्यतेलाच्या किंमती भिडल्या गगनाला

दूध आणि इंधनासोबत घरसामानाच्या सर्व वस्तू आणि कारणा एका वर्षात तब्बल ४० टक्क्यांनी महागलाय. तर दुसरीकडे खाद्य तेलाच्या किंमती ५० टक्क्यांनी महगल्या आहेत. एफएमसीजीमधील दर २० टक्क्यांनी वाढल्याचं चित्र पाहायला मिळालेलंय.

हेही वाचा : गुळे येथे एकाच जागी दोन म्हालवाहू ट्रक कलंडले

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!