रेमेडेसिवीरच्या तुटवड्यामुळे रूग्णांची परवड

इंजेक्शन मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांची होतेय धावपळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात एकीकडे ऑक्सिजनच्या तुटवड्याचा विषय एरणीवर असताना आता रेमेडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याचा प्रश्न चर्चेत आलाय. सरकारने जाहीर केलेल्या एजन्सींकडून स्टॉक संपल्याचे रूग्णांच्या नातेवाईकांना सांगण्यात येते आणि त्यामुळे इंजेक्शन्सच्या शोधार्थ त्यांची सगळीकडे धावपळ होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय.
दक्षिण गोव्यातील मुरगांव तालुक्यातील एका खाजगी इस्पितळात एक कोरोना रूग्ण दाखल आहे. या रूग्णाच्या उपचारार्थ रेमेडेसिवीर इंजेक्शनची गरज असल्याचे सांगून त्यांच्या नातेवाईकांकडे प्रिस्क्रिपशन आणि इस्पितळाकडून पत्र देण्यात आलं. मुरगांव तालुक्यात एकही एजन्सी सरकारच्या यादीत नसल्याने त्यांनी बांबोळीतील व्हेलनेस फार्मसीत धाव घेतली. तिथे पोहचले असता रेमेडेसिवीर इंजेक्शन स्टॉकमध्ये नसल्याचे सांगण्यात आले. त्यांना सहा इंजेक्शनची गरज होती परंतु फार्मसीकडून केवळ एक इंजेक्शन देण्यात आले. हे इंजेक्शन घेऊन त्यांनी पुन्हा खाजगी इस्पितळ गाठले तर तिथे डॉक्टरांनी सांगितले की केवळ एका डोसच्या आधारावर इंजेक्शन देता येत नाही तर किमान दोन डोस उपलब्ध असायला हवे. दरम्यान, त्यांनी प्रिस्क्रीपशन आणि इस्पितळाचे पत्र व्हेलनेस फार्मसीकडे ठेवले होते.
संध्याकाळी पुन्हा व्हेलनेसकडे संपर्क साधला असता त्यांनी आत्ताच स्टॉक पोहचल्याचे सांगितले. स्टॉक कसा काय संपला असे विचारले असता याची मागणी भरपूर असल्यामुळे स्टॉक अजिबात राहत नाही, असे उत्तर देण्यात आले. तुम्हाला हवे असेल तर ताबडतोब या अन्यथा तोही स्टॉक संपेल,असेही सांगण्यात आले. शेवटी या कुटुंबियांना पुन्हा एकदा मुरगांवहून बांबोळीत धाव घ्यावी लागली.

राज्यात रेमडेसिवीरची गरज ओळखून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कार्यालयानं काही एजन्सींकडे रेमडेसिवीरच्या पुरवठ्याची जबाबदारी सोपवलीय. कोविडबाधित रुग्णांवर उपचार करणार्‍या इस्पितळांना रेमडेसिवीर इंजेक्शन्स पुरवण्याची जबाबदारी या एजन्सींना दिलीय. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून या एजन्सींची नावं आणि संपर्क क्रमांकही जाहीर करण्यात आलेत.

एजन्सी आणि त्यांचे संपर्क क्रमांक

मेसर्स सांबारी एंटरप्रायझेस, मडगाव : संपर्क क्रमांक 8888612836
मसेर्स द्रोगारिया अनंता, पणजी : संपर्क क्रमांक 9422059360
मेसर्स रायकर डिस्ट्रिब्युटर्स, मडगाव : संपर्क क्रमांक 9579651779
मेसर्स ई. सी. एजन्सीज, मडगाव : संपर्क क्रमांक 9689924771
मेसर्स जी. एन. एजन्सीज, म्हापसा : संपर्क क्रमांक 8600993789
मेसर्स द्रोगारिया कोलवाळकर, म्हापसा : संपर्क क्रमांक 9822100449
मेसर्स लिवुम फार्मा, मंगेशी : संपर्क क्रमांक 8007001811
मेसर्स वेलनेस फॉरेव्हर लाईफस्टाईल, बांबोळी : संपर्क क्रमांक 9766980009

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!