प्रवास करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट हवंय? मग हे नक्की वाचा

आता खासगी लॅबमधून करावी लागणार कोरोना चाचणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 23 मे पर्यंत राज्यव्यापी कर्फ्यू लावलाय. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकावर नियंत्रण मिळविण्याचा एक भाग म्हणून राज्य सरकारने बाहेरून गोव्यात येणाऱ्यांसाठी कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट बंधनकारक केलं आहे. याला धरूनच आता एक नवीन अपडेट समोर येतेय. ज्यांना कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट हवंय, त्यांच्यासाठी ही बातमी विशेष महत्त्वाची आहे.

हेही वाचाः जनजीवन सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू

खासगी लॅबमधून करावी लागणार कोरोना चाचणी

आता ज्यांना प्रवास करण्यासाठी कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेटची आवश्यक आहे, त्यांना ते मिळविण्यासाठी खासगी लॅबमध्ये जावं लागणार आहे. तशी भूमिका एडव्होकेट जनरल यांनी हायकोर्टात मांडली आहे. त्यामुळे कदाचित आता कोरोना निगेटिव्ह सर्टिफिकेट मिळवण्यासाठी थोडे जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतील. सरकारी आरोग्य यंत्रणांवर वाढणारा ताण कमी करण्यासाठी अशी भूमिका एडव्होकेट जनरलकडून घेण्यात आली आहे.

हेही वाचाः गोवा कोविडबाधितांमध्ये पुढे, तर लसीकरण मोहिमेत मागे

कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट बंधनकारक करण्याचे हायकोर्टाचे आदेश

10 मेपासून राज्यात येणार्‍या प्रवासी आणि पर्यटकांना कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अनिवार्य करा, अशी सूचना हायकोर्टाने सरकारला दिली होती. कोविडबाधितांवर उपचार करणार्‍या सरकारी हॉस्पिटलांना पोलिस संरक्षण द्या, असेही निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेले.

हेही वाचाः कोलवाळ जेलमधील अंडर ट्रायल कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू

आधी कोरोना, मग तौक्ते वादळ यांच्या रुपाने राज्यावर नवनवीन संकट ओढवतच आहेत. सध्या जगासमोर आ वासून उभं असलेलं सर्वांत मोठं संकट म्हणजे कोरोना. या संकटाशी दोन हात करण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने लढतो आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!