केपे नगरपालिका आरक्षणात प्रशासकीय बेजबाबदारपणाने गाठला कळस

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

केपेः पालिका आरक्षणाचा घोळ संपून संपत नाही. आता पुन्हा एकदा पालिका आरक्षणाच्या अनागोंदी कारभारावरुन डीएमएची नाचक्की झाली आहे. केपे नगरपालिकेचं आरक्षणात चुक झाल्याची बाब मान्य करुन आरक्षण पुन्हा नव्याने जाहीर करणार असल्याच डीएमएचे संचालक गुरुदास पिळर्णकरांनी केपेच्या लोकांना आश्वासन दिलंय. केपे पालिकेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त प्रभाग आरक्षीत केल्याने दयेश नाईक, चेतन हळदणकरांसह सुमारे दोनेकशे लोकांनी गुरुवारी डीएमए संचालकांवर मोर्चा नेला.

नगरपालिका आरक्षणात दुरूस्ती करण्याचं पालिका प्रशासनाकडून आश्वासन

कायद्याने आरक्षण हे ५० टक्क्यांपेक्षा जास्त असू शकत नाही. मात्र डिएमएने सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नव्याने घोषीत केलेलं केपे पालिकेंच आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा जास्त होत. १३ प्रभागातील ८ प्रभाग आरक्षीत केल्याने वाद निर्माण झाला होता. शुक्रवारी दयेश नाईक, चेतन हळदणकर व केपेच्या सुमारे २०० जणांनी डीएमए मोर्चा नेला. केपे पालिकेतील २ प्रभागांच आरक्षण रद्द करावी ही त्यांची मागणी होती. या मागणीवर डीएमएचे संचालक गुरुदास पिळर्णकरांनी त्यांच्याशी चर्चा केली व केपे पालिकेचं आरक्षण ५० टक्क्यापेक्षा जास्त असल्याची कबुली देत ते नियमांनुसार करण्याची हमी संचालक पिळर्णकरांनी यावेळी दयेश नाईक, चेतन हळदणकर व इतरांनी दिली. संचलकांच्या या हमी नंतर मोर्चा मागे घेतला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!