अदानींकडून कर वसुली जमत नाही की करायची इच्छा नाही?

आम आदमी पक्षाचे प्रवक्ते राहुल म्हांबरेंचा भाजप सरकारवर आरोप

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी

पणजी : अदानी आणि जिंदाल या उद्योग समूहांनी ’गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण सेस’ भरण्यास नकार दिल्यानं आम आदमी पक्षांना त्यांचा तीव्र शब्दांत निषेध केलाय. सर्वसामान्य गोमंतकीयांना मदत करण्यासाठी अदानींकडून कर वसूल करण्याची जोरदार मागणी आपचे प्रवक्ते राहुल म्हांबरेंनी केलीय. कोळसा वाहतूक करताना सर्व प्रकारची खबरदारी घेण्यात येत असल्यानं प्रदूषण होत नाही. त्यामुळं कर भरण्याचा प्रश्नच येत नसल्याची उद्दामपणाची भूमिका अदानी समूहानं घेतल्यानं आपनं जोरदार पटलावर केलाय.

सरकार अदानीच्या विरोधात कारवाई का करत नाही? कुणाचं हित साधण्याचा प्रयत्न केला जात आहे? गोव्याच्या जनतेने तो भार का वाहायचा ? कॅगनं नोंदवलेल्या मुद्द्यांकडं सरकार दुर्लक्ष का करतंय?
राहुल म्हांबरे, आपचे प्रवक्ते

गोवेकरांच्या जिवावर अदानी

गोवा राज्यावरील कर्ज २० हजार कोटी एवढं झालंय. भाजप सरकारला गोव्यात १० वर्षं पूर्ण होत असून, कर्ज कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीए.
भाजप सरकार अकार्यक्षम आहेच, पण अदानीबरोबरच्या स्वार्थामुळं गोव्याला आर्थिक संकटात ढकलला जातोय. अदानी गोवेकरांच्या जीवावर पैसा करत असल्याचा आरोप कर सेस भरण्यास भाग पाडण्याचं आवाहन आपनं केलंय.

सरकार आर्थिक संकटात, तरीही…


आर्थिक संकटाला तोंड देण्यासाठी सरकार सार्वजनिक योजनांमधून मिळणार्‍या पैशांमध्ये वा लाभामध्ये घट करत आहे. गृहनिर्माण योजनेखाली सरकारी कर्मचार्‍यांना घरासाठी कर्ज सवलत रद्द केली, गृह आधार आणि दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजनेची मासिक रक्कम सहा महिने दिलेली नाही. दीन दयाळ स्वास्थ्य सेवा योजना खासगी हॉस्पिटलांमध्ये कोविड उपचारासाठी अंतर्भूत करण्याचा प्रस्ताव गुंडाळला, दर्यवर्दींना पेन्शन दिलेली नाही, लाडली लक्ष्मीची रक्कम कमी करण्याच्या उद्देशाने अधिसूचना काढली आहे. गोवेकरांचे खिसे रिकामे करणे आणि अदानींचे खिसे भरणे ही भाजपची आर्थिक नीती आहे, असा टोलाही राहुल म्हांबरे यांनी हाणला.

हेही वाचा

या पक्षानं दिलेलं गुन्हेगारीमुक्त भाजपचं आव्हान मुख्यमंत्र्यांना पेलणार?

मज्जानी लाईफ! आज्जीबाईंची हौस लय भारी…

#GOOD NEWS : कर्जदारांना चक्रवाढ व्याज मिळणार परत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!