‘ईएसआय’ अंतर्गत कामगारांसाठी वैद्यकीय सुविधा तातडीनं सुरू करा !

ऑल इंडीया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) गोवा सचिव सुहास नाईक यांची 'सीएम'ना मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : ईएसआय म्हणजेच कामगारांसाठी असणा-या सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत वैद्यकीय सुविधा गेल्या काही दिवसांपासून बंद आहे. सध्याचा कोरोना महामारीचा कालावधी पाहता ही सुविधा तातडीनं सुरू करण्यात यावी, अशी मागणी आॅल इंडीया ट्रेड युनियन काँग्रेसचे गोवा सचिव सुहास नाईक यांनी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्याकडं केलीय.
सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत गोव्यात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सुविधा आणि दवाखाने सध्या बंद आहेत. कामगारांना कोणत्याही आजाराची लक्षणे दिसू लागली किंवा जर ते आजारी पडले तर त्यांना वैद्यकीय रजा किंवा अन्य सुविधा देण्यासाठी याच दवाखान्यांचा दाखला ग्राहय मानला जातो. मात्र सध्याच्या कोरोना महामारीच्या कालावधीत कामगारांना या सुविधा अजिबात उपलब्ध होत नाहीत. अनेक कामगारांना याची हानी पोहोचत आहे. त्यामुळं तातडीनं सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत सर्व कामगारांना तातडीनं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांच्याकडं करण्यात आलीय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!