गाडीवर काळी काच लावताय.. तर ही बातमी वाचाच…

गाड्यांच्या काळ्या काचा, प्रदूषणावर होणार कारवाई, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्होंची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: तुमच्या चारचाकीवर तुम्ही काळी काच लावताय, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वाहनांना काळ्या काचा लावणं कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्यामुळे राज्यात आता चारचाकी वाहनांना काळ्या काचा आणि सायलेन्सरमधून होणारं प्रदूषण याविषयी कारवाई करण्याबाबतची मोहीम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिली. एका शोरूममध्ये झालेल्या कार्यक्रमादरम्यान बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचाः खळबळजनक! तिने लग्नाला नकार दिला म्हणून त्याने केलं असं…

कायद्याचं पालन न केल्यास कारवाई

राज्यात सध्या सीट बेल्ट आणि हेल्मेटसक्तीची कारवाई जोरदार सुरू आहे. या कारवाईमुळे आता बरेच वाहनचालक हेल्मेटचा वापर करू लागलेत. दरम्यान, चारचाकी वाहनांना काही चालक काळ्या काचा बसवतात. त्यामुळे त्या वाहनांत कोण आहेत हे कळत नाहीत. त्यामुळे यापुढे वाहतूक पोलिस अशा गाड्यांवर कारवाई करणारेत. तसंच काहीजण गाड्यांचा मोठा आवाज होईल अशा प्रकारचे सायलेन्सर बसवतात. अशा गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होतं. त्यामुळे त्यावरही कारवाई होणार असल्याचं गुदिन्हो यांनी सांगितलं.

मंत्री गुदिन्हो म्हणाले…

रस्ते दुरुस्तीसह प्रमुख मुलभूत सुविधा तयार झाल्यानंतर राज्यात सुधारित मोटर वाहन कायद्याची कार्यवाही होणार आहे. अलीकडे अपघातांचं प्रमाण वाढतंय. त्यासाठी प्रत्येकाने कायद्याचं पालन करणं बंधनकारक आहे. एकीकडे आम्हाला राज्यातील अपघातांचं प्रमाण कमी करायचंय आणि दुसरीकडे कायदाच नको, असं होऊ शकत नाही. कायदे हे सर्वांच्या हितासाठी आहेत, असंही ते म्हणाले.

गोवा माईल्स आणि टॅक्सी सेवेचा प्रश्न सुटणं आवश्यक

करोना महामारीचं प्रमाण कमी झाल्यामुळे आता पर्यटक गोव्यात येण्यास सुरुवात झालीये. या पर्यटकांसाठी गोवा माईल्स आणि टॅक्सी सेवेचा प्रश्न सुटणं आवश्यक आहे. हा प्रश्न न सुटल्यास या वादाचा फटका पर्यटकांना बसणारेय. त्यामुळे पर्यटकांचा आकडाही कमी होण्याची भीती नाकारता येत नाही.

दरम्यान, गोवा माईल्सचा प्रश्न सुटण्यासाठी सर्व कागदपत्रे वाहतूक खात्याकडे वर्ग करण्यासाठी आपण मुख्य सचिवांना सांगितलं आहे. सदर कागदपत्रे वाहतूक खात्याकडे आल्यानंतरच हा प्रश्न सोडविणं शक्य होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

हेही वाचा –

ACCIDENT | कारचा अपघात; दोघे जखमी

८ वर्ष जुनी गाडी वापरत असाल तर ही बातमी वाचाच!

FASTAG | नो फास्ट टॅग, भरा दुप्पट टोल

ALERT! पेट्रोल भरताना तुमची अशी होते फसवणूक!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.