डिचोलीत मेट्रोलॉजी विभागाची कारवाई

विक्रेत्याने मार्गदर्शन तत्वांना बगल दिल्याने कारवाई

विनायक सामंत | प्रतिनिधी

डिचोलीः वस्तूंवर उत्पादकांचे नाव, पत्ता, तारीख, महिना, उत्पादन वापरण्याची अंतिम तारीख, पॅकिंग तारीख आणि इतर गोष्टींची पूर्तता करण्यात न आल्याने गोवा मेट्रोलॉजी विभागाने डिचोली भागात एका दुकानावर छापा मारून वस्तू जप्त केल्या आहेत. नागरिकांनी कोणतीही वस्तूं विकत घेताना योग्य ती सावधगिरी बाळगावी, असं आवाहन डिचोली मेट्रोलॉजी विभागाचे इन्स्पेक्टर विकास कांदोळकर यांनी केलं आहे.

हेही वाचाः ‘ती’ अ‍ॅडमिट असल्याचं समजताच दीपिका पदुकोणने गेली मदतीला धावून

हार्डवेअर कम पावर टूल दुकानावर छापा

डिचोलीतील एका हार्डवेअर कम पावर टूल दुकानावर हा छापा मारण्यात आला. डिचोली मेट्रोलॉजी विभागाने लिगल कोमोडिटी एक्ट आणि पॅकेज कमोडिटी एक्ट अंतर्गत नुसार ही मोहिम राबली आहे. त्या मोहिमेंतर्गत काहीजण त्यांच्या तावडीत सापडले. 

विक्रेत्याने मार्गदर्शन तत्वांना बगल

डिचोलीतील हिराबाई झाट्ये सभागृहा शेजारी असलेल्या पॉवर टूल दुकानावर तपासणी करण्यात आली असता विक्रेत्याने मार्गदर्शन तत्वांना बगल दिल्याचं आढळून आलं. त्या दुकानातील असंख्य उत्पादनांवर उत्पादकांचे नाव, पत्ता, तारीख, महिना, उत्पादन वापरण्याची अंतिम तारीख, पॅकिंग तारीख आणि इतर गोष्टी देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे या वस्तू जप्त करण्यात आल्या. उत्पादनांवर एमआरपी नसल्याने अंदाजे किती किमतीचा माल जप्त केलाय याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही, असं इन्स्पेक्टर विकास कांदोळकर यांनी सांगितलं.

हेही वाचाः भारतीय नेमबाजांकडून पदकांची लयलूट, मनीष सुवर्ण, तर सिंहराज रौप्यपदकाचा मानकरी

तपासून वस्तू खरेदी करा

ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी पुढील नमूद केलेल्या अनिवार्य गोष्टींची तपासणी करावी. वस्तूंवर उत्पादक, पॅकर, आयातकाचे नाव, संपूर्ण पत्ता हवा. वस्तू कुठून आयात केली, त्या देशाचं नाव, उत्पादन कालावधी, पॅकिंगपूर्वीची तारीख-महिना, आयात तारीख-महिना, जास्तीतजास्त किरकोळ किंमत आणि इतर गोष्टीं पाहाव्यात. तक्रारीबाबत कोणाकडे संपर्क साधावा त्या व्यक्तीचे नाव, कार्यालयाचे नाव, संपूर्ण पत्ता, इमेल पत्ता, संपर्क क्रमांक छापला की नाही हे पाहिले पाहिजे, असं आवाहन इन्स्पेक्टर विकास कांदोळकर यांनी केलं.

हेही वाचाः काँग्रेसला आघाडीची तूर्त इच्छा नाहीच!

दरम्यान चतुर्थीच्या काळात ही मोहिम डिचोलीसह साखळी आणि सत्तरी तालुक्यात सुरू असणार असल्याची माहिती इन्स्पेक्टर विकास कांदोळकर यांनी दिली.

हा व्हिडिओ पहाः कामाची बातमी | PF Account | तुम्ही PF अकाऊंड होल्डर आहात? मग हे बघाच

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!