मडगावात मद्यपान करुन गाड्या चालवणाऱ्यांवर कारवाई…

पाच चालकांवर कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : येथील पोलिसांकडून मद्यपान करुन गाड्या चालवणाऱ्या चालकांविरोधात कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. मडगाव वाहतूक पोलिसांकडून दिवसभरात खासगी बस, कार, दुचाकी यांच्या चालकांची तपासणी करण्यात आली. यातील पाच चालक मद्यपान करुन असल्याचे आढळून आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा:शिक्षण क्षेत्रातील वारसा जपण्यास सावंत सरकार अपयशी…

मद्यपान करुन गाड्या चालवणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद

राज्यातील अपघातांची संख्या वाढलेली असल्याने गोवा पोलिसांनी मद्यपान करुन गाड्या चालवणा ऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्याची कारवाई सुरू केली आहे. मडगावातील वाहतूक पोलिसांनीही दिवसभरात पाच चालकांविरोधात मद्यपान करून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा नोंद केलेला आहे. मडगाव वाहतूक पोलिसांनी गुरुवारी दुपारी मडगावातील कदंब बसस्थानकानजीक थांबून कदंबच्या बसचालकांसह खासगी गाड्यांच्या चालकांचीही चाचणी केली. दिवसभरात सुमारे ३० ते ४० बसचालकांची मद्यपान चाचणी करण्यात आली.
हेही वाचा:250 चे तिकीट 500 ते 800 रूपये; लॉटरी तिकिटांंची ब्लॅकमध्ये विक्री…

मद्यपानामुळे मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ

मात्र, एकही बसचालक मद्यपान केलेला आढळून आलेला नसल्याचे पोलीस निरीक्षक, गौतम साळुंखे यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक गौतम साळुंखे यांनी सांगितले की, अपघातांची संख्या या दिवसांत वाढलेली आहे व त्यात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची संख्याही वाढलेली आढळून आली. बहुतांशी अपघात हे मद्यपान करुन गाड्या चालवण्यात आल्याने झाले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून मोहीम राबवण्यात येत आहे.
हेही वाचा:अटल सेतूवरील लाखोंचे वीज साहित्य चोरीला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!