CRIME | आरोपी विश्रांती गावसला सशर्त जामीन मंजूर

बाळ अपहरण प्रकरण; पणजी न्याय दंडाधिकाऱ्यांनी सुनावली होती 5 दिवसांची पोलिस कोठडी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः बांबोळी येथील ‘गोवा मेडिकल कॉलेज’मध्ये (गोमेकॉ) एका महिन्याच्या बाळ अपहरण केल्या प्रकरणात आरोपी विश्रांती गावस हीला पणजीच्या बाल न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचाः म्हापसा पोलिसांकडून चोरी प्रकरणी एकास अटक

न्याय दंडाधिकाऱ्यांनी सुनावली होती 5 दिवसांची पोलिस कोठडी

पणजीच्या न्याय दंडाधिकाऱ्यांनी गावस हिला 5 दिवसांच्या पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी बाळाची खरी आई ओळखण्यासाठी दोन्ही महिलांची ‘डीएनए ’चाचणीही घेतली होती.
‘गोमेकॉ’ च्या आवारातून अपहरण करण्यात आलेल्या बाळाला आणि अपहरण करणाऱ्या महिलेचा शोध लावण्यात आणि तिला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. सदर अर्भक आणि संशयित महिला हिला वाळपई येथील सालेली गावात आढळली होती.

हेही वाचाः पेडणे पोलिसांकडून चोरी प्रकरणी एकास अटक

सालेली-वाळपईतून केली होती अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण करणाऱ्या गावस हिचा दावा आहे की ते मूल तिचं स्वतःचं आहे. मुलाच्या जैविक आईचा शोध घेण्यासाठी, पोलिसांनी आई असल्याचा दावा करणाऱ्या ओरिसामधील एका महिलेसह, दोघांचीही वैद्यकीय तपासणी केली. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा कबूल केला होता आणि तिच्यावर आगशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचाः CORONA UPDATE | कोविड पॉझिटिव्हीटी दर घटला

अपहरणाचा घटनाक्रम

विश्रांती गांवसने जीएमसीतून एका महिन्याच्या बाळाला पळवलं.
२. अपह्रत बाळाला घेऊन विश्रांती सव्वातीनच्या सुमारास म्हापसा करासवाड्यात पोहोचली.
३. करासवाडा येथे विश्रांतीने लिफ्ट घेऊन गाठलं मुळगाव.
४. मुळगावातून विश्रांती एका खासगी बसने पोहचली सालेलीत.
५. वाळपई पोलिसांना सुगावा लागताच घेतले बस ड्रायव्हर, कंडक्टरला ताब्यात
६. चौकशीअंती पोलिस पोहोचले विश्रांतीच्या घरी
७. विश्रांतीकडून बाळ ताब्यात आणि अपहरणाचा झाला पोलखोल

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!